Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकणी बंधाऱ्यात पडलेल्या महिलेचे सरपंचाने वाचवले प्राण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पाकणी बंधाऱ्यात पडलेल्या महिलेचे सरपंचाने वाचवले प्राण

Surajya Digital
Last updated: 2023/01/26 at 9:48 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□  शेतीच्या वादातून दोन गटात तलवार आणि रॉडने मारहाण ५ जखमीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ पोलिसात तक्रार दिली म्हणून अंगावर टेंपो घातली; चिकुंद्रा येथे दोघे जखमी□ गड्डा यात्रेत पाळण्यातून पडल्याने ४ वर्षाचा मुलगा जखमी

विरवडे बु – रस्त्याने पायी गावाकडे जात असताना तोल जाऊन बंधा-याच्या पाण्यात पडलेल्या एका महिलेला रस्त्याने ये जा करणारे पाकणी गावचे सरपंच बालाजी येलगुंडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता बंधा-याच्या पाण्यात उडी मारत या वृद्धेला वाचवले. Sarpanch saved the life of a woman who fell into the Pakni Dam, Solapur Mohol

 

सविस्तर माहिती अशी की – मंगळवारी (ता. 24 जानेवारी) सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे पाकणीतून सरपंच बालाजी यलगुंडे हे रस्त्याने जात असताना त्यांना एक वृध्द महिला विजूबाई शहाजी चटके ( वय ६५ , रा. विरवडे खुर्द ता मोहोळ) पाय घसरून पडल्याचे निदर्शनास आले.

 

सरपंच येळगुंडे यांनी सदर महिलेला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारून घट्ट पकडून काठापर्यंत आणले आणि सदर महिलेच्या नातेवाईकाला संपर्क साधून त्यांच्या स्वाधीन केले. त्यामुळे सरपंच येलगुंडे यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

 

 

□  शेतीच्या वादातून दोन गटात तलवार आणि रॉडने मारहाण ५ जखमी

 

सोलापूर – शेतातील रस्त्याच्या वादातून सपाटे आणि गरड यांच्या गटात तलवार लोखंडी गज आणि काठीने झालेल्या मारहाणीत ५ जण जखमी झाले. ही घटना उपळवाटे (ता.माढा) येथे बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. त्यांना टेंभुर्णी येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शरद सुभाष सपाटे (वय ३०) आणि त्यांचा भाऊ सागर सपाटे ( वय ३२ रा. उपळवाटे ) अशी पहिल्या गटातील जखमींची नावे आहेत. त्यांना शेतातील रस्त्याच्या वादातून नीलकंठ गरड, दत्तात्रय गरड आणि अन्य तिघांनी तलवार आणि लोखंडी गज यांनी मारहाण केली. दोघांच्या डोक्यात गंभीर जखमा आहेत.

तर दुसऱ्या गटातील भालचंद गरड (वय ३०) त्याचा भाऊ नीलकंठ दत्तात्रय गरड (वय ३५) आणि दत्तात्रय वासुदेव गरड (वय ५५ सर्व रा. उपळवाटे) असे तिघेजण जखमी झाले. आपल्या शेतातील वाटेवरून ट्रॅक्टर का आणला. असे विचारल्याच्या कारणावरून सागर सपाटे आणि सुरेश सपाटे यांनी रॉड आणि काठीने मारहाण केली अशी प्राथमिक नोंद तालुका पोलीसात झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ पोलिसात तक्रार दिली म्हणून अंगावर टेंपो घातली; चिकुंद्रा येथे दोघे जखमी

 

सोलापूर – आपल्या विरुद्ध पोलिसात तक्रार का दिली? या कारणावरून वेगाने जाणारी पिकप अंगावर घातल्याने अंबादास विठोबा मोरे(वय ४९) आणि लक्ष्मण धनराज मोरे (वय ३२) हे दोघे जखमी झाले. ही घटना आज बुधवारी सकाळी चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथील चौकात घडली. त्यांना नळदुर्ग येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्ञानेश्वर सुरेश गायकवाड याने सकाळी १० वाजेच्या सुमारास हा प्रकार केला. अशी नोंद सिव्हील पोलिस चौकीत झाली आहे.

 

तर पिकपचा चालक ज्ञानेश्वर सुरेश गायकवाड (वय २३ रा.चिकुंद्रा) हा देखील मारहाणीत जखमी झाला. शेतीच्या वादातून त्याला अंबादास मोरे,लखन मोरे आणि अन्य सात ते आठ जणांनी दगड आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्याला देखील सोलापुरात दाखल करण्यात आले.

 

□ गड्डा यात्रेत पाळण्यातून पडल्याने ४ वर्षाचा मुलगा जखमी

 

सोलापूर – शहरातील गड्डा यात्रेत पाळण्यावरून खाली पडल्याने चार वर्षाचा मुलगा जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.

हर्ष किसन राठोड (वय ४ वर्षे रा. तेरामैल, ता.दक्षिण सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी काजल राठोड (आई) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. हर्ष हा इतर मुलासोबत यात्रेतील लहान पाळण्यात बसला होता. त्यावेळी तोल जाऊन खाली पडल्याने त्याच्या डोकीस जखम झाली. अशी नोंद सदर बझार पोलिसात झाली आहे.

 

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Sarpanch #saved #life #woman #fell #Pakni #Dam #Solapur #Mohol, #सोलापूर #पाकणी #मोहोळ #बंधारा #महिला #सरपंच #वाचवले #प्राण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी सतीश मुळे; उपाध्यक्षपदी माधुरी जोशींची निवड
Next Article असद अल्ताफ बागवान heavy traffic सोलापूर | चार दिवसात दुसरी घटना; जड वाहतुकीत चिमुकल्याचा बळी

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?