Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एकाच कुटुंबातील चौघांचा खून; खांडोळ्या करुन मेढा मारली घाटात टाकले, सांगलीतील कुटुंब
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

एकाच कुटुंबातील चौघांचा खून; खांडोळ्या करुन मेढा मारली घाटात टाकले, सांगलीतील कुटुंब

Surajya Digital
Last updated: 2020/09/01 at 11:26 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सातारा / सांगली : सातारा जिल्ह्यात सिरीयल किलर संतोष पोळ हत्याकांडासारखी पुनरावृत्ती झाली आहे. जावळी तालुक्यातील मेढा मारली घाटामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा खून करुन मृतदेहाचे तुकडे करुन फेकून देण्याचा विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले असून अजून एका मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

हे मृत कुटुंब सांगली जिल्ह्यातील बामनोली गावातील असल्याची माहिती समोर येते आहे. दोन मुलांसह त्याच्या आई-वडिलांना घाटातील जंगलात मारुन ते मृतदेह प्लास्टिक बॅगेत भरुन या घाटात फेकून देण्यात आले होते.
येणाऱ्या – जाणाऱ्या ग्रामस्थांना उग्र वास येऊ लागल्यानंतर मेढा पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने यातील तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. अजून एका मृतदेहाचा शोध सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे हे तीन मृतदेह एकाच दिवशी पोलिसांना सापडले नाहीत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

11 ऑगस्टला पहिला मृतदेह सापडला. त्यानंतर 29 ऑगस्टला एका महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर काल 31ऑगस्टला एका मुलाचा मृतदेह शोधण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पोलिसांना यश आले आहे. अजून देखील एका मुतदेहाचा शोध सुरु आहे. हे हत्याकांड नेमके कोणत्या करणातून झाले, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, एकाच कुटुंबातील चौघांची अशी हत्या केल्याने सातारा जिल्ह्यात या घटनेने खळबळ माजली आहे.

* मृत कुटुंब सांगलीचे; एकास घेतले ताब्यात

मृत कुटुंब सांगली जिल्ह्यातील बामणोलीचे असून घटनेच्या नेमक्या कारणाचा पोलिस शोध घेत असले तरी पैशाच्या हव्यासापोटीच नराधमाने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा कयास आहे. तानाजी विठोबा जाधव (वय 55), पत्नी सौ. मंदाकिनी जाधव (वय 50), मोठा मुलगा तुषार जाधव (वय 26) व छोटा मुलगा विशाल जाधव (वय 20) अशी खून झालेल्या चौघांची नावे आहेत. हे सर्वजण दत्तनगर, बामणोली, ता. मिरज, जि. सांगली येथील राहणारे आहेत. खूनप्रकरणी योगेश निकम (रा. सोमर्डी, ता. जावली) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पैशांच्या देवाण घेवाणीतून हे हत्याकांड घडलं असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी जावळी तालुक्यातील सोमर्डी गावातील संशयित योगेश निकम याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

You Might Also Like

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ

TAGGED: #सातारा #घाट #चौघांचा #खून #खांडोळ्या #खळबळ #पैश्याच्या #हव्यासापोटी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरीतील आंदोलन, प्रकाश आंबेडकरांसह 1100 जणांवर गुन्हा दाखल
Next Article मंदिर उघडण्याची मागणी : औरंगाबादमध्ये तणावाची परिस्थिती, शिवसेना आणि एमआयएम आमने – सामने

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?