Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सत्यजित पाटणकर आणि वैभव पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सत्यजित पाटणकर आणि वैभव पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश

admin
Last updated: 2025/06/10 at 7:52 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 10 जून (हिं.स.)।

शरद पवार यांचे विश्वासू सहकारी, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर तसेच खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

यावेळी भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला खा. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सातारा जिल्हाध्यक्ष आ. अतुलबाबा भोसले, सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आ. सत्यजित देशमुख, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

यावेळी कार्याध्यक्ष चव्हाण म्हणाले की, 2019 आणि 2024 ला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विधानसभा उमेदवार असलेल्या पाटणकर आणि पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाटणकर आणि पाटील यांनी भाजपाला साथ दिली आहे. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचा यथोचित मान राखला जाईल, अशी ग्वाहीही चव्हाण यांनी दिली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या सोबत हिंदूराव पाटील, याज्ञसेन पाटणकर, राजाभाऊ शेलार, राजेश पवार, आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. पाटण तालुका दूधसंघ, अर्बन बँक व खरेदी विक्री संघाचे चेअरमन तसेच सर्व संचालकांनी तसेच सर्व आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, सर्व सदस्यांनी ही भाजपा मध्ये प्रवेश केला. पाटण नगर पंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचाही भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये समावेश आहे.

You Might Also Like

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा

पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण

मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जालना – शेतात विजेचा झटका बसून वडिलांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Next Article जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मागणी शरद पवारांनी केली मान्य

Latest News

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक
महाराष्ट्र June 23, 2025
सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा
महाराष्ट्र June 23, 2025
पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग
महाराष्ट्र June 23, 2025
ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
देश - विदेश June 23, 2025
इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?