Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सावळेश्वरात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील एक ठार; चालक जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सावळेश्वरात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील एक ठार; चालक जखमी

Surajya Digital
Last updated: 2021/11/05 at 5:29 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : पुणे महामार्गावरील सावळेश्वर येथे येथे अनोळखी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात  गुरुवारी (ता. ४) दुपारच्या सुमारास सावळेश्वर येथील ओढ्याच्या पुलावर झाला.

शशिकांत नरहरी कुलकर्णी (वय ६०रा.पाकणी ता. दक्षिण ) असे मयताचे नाव आहे. तर अण्णासाहेब निवृत्ती खंडागळे ( वय २०, रा. पिरटाकळी ता. मोहोळ) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात. खंडागळे आणि कुलकर्णी हे दोघे दुचाकीवरून मोहोळ ते सोलापूर असा प्रवास करीत दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकी सावळेश्वर येथील ओढ्याच्या पुलावर आली होती.

त्यावेळी सोलापूरच्या दिशेने जाणारी अनोळखी चार चाकी वाहन धडकल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता शशिकांत कुलकर्णी हे उपचारापूर्वी मयत झाले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* फटाके आणण्यास गेलेल्या तरुणाचा अपघातात दुर्देवी मृत्यू

बार्शी : दिवाळी सणासाठी तेरखेड्यावरुन फटाके आणण्यास गेलेल्या तरुणाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागेवरच मृत्यू झाला. बार्शी-सोलापूर रस्त्यावर पानगावच्या अलिकडे असलेल्या सोमाणी मळ्याजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर धडक देणार्‍या वाहनाचा चालक पळून गेला. बिरुदेव अभिमान पुजारी (रा. सावळेश्वर ता. मोहोळ ) असे मयताचे नाव असून त्याचा मावसभाऊ विशाल तानाजी शेंडगे (रा. मानेगाव ता. बार्शी) याने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बिरुदेव पुजारी हा उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा या फटाके निर्मितीसाठी प्रसिध्द असलेल्या गावात सकाळी 12 वा. दुचाकीवरुन फटाके आणण्यासाठी गेला होता. जाताना तो विशाल याला मानेगाव येथे येवून भेटून गेला होता. परतताना तो पुन्हा मानेगाव येथे येवून भाच्च्याला दिवाळी सणासाठी गावी घेऊन जाणार होता. त्यामुळे त्याच्या परतण्याची सर्वजण प्रतिक्षा करत होते.

मात्र रात्र झाली तरी तो न परतल्यामुळे विशालने त्याच्या फोनवर संपर्क साधला असता फोन उचलणार्‍याने त्यांना त्याचा अपघात होवून तो जागेवर बेशुध्द अवस्थेत पडलेला असल्याचे सांगितले. त्यामुळे ते तातडीने अपघातस्थळी गेले असता बिरुदेव डोक्यास व पायाला गंभीर मार लागलेल्या अवस्थेत होता.

त्याच्या जवळ त्याची मोटार सायकलची (एम.एच.13/ए.यु 8096) मोडतोड होऊन पडलेली होती.  रात्री 08:00 वा सुमारास कोणत्या तरी अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीस समोरुन जोराची धडक देवुन त्यास गंभीर जखमी करुन व वाहनाचे नुकसान करुन कोणतीही वैद्यकीय मदत न पुरविता निघून गेल्याचे कळले. दवाखान्यात नेले असता त्यास मृत घोषित करण्यात आले.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Onekilled #two-wheeler #Savleshwar #Driver #injured, #सावळेश्वर #वाहन #अपघात #दुचाकी #एकठार #चालक #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी
Next Article अचानक फटाका फुटला अन् अभिनेत्री थोडक्यात बचावली

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?