Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Bike accident सावळेश्वर येथे दुचाकीचा अपघात; तरुण पुतण्या ठार, चुलता जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

Bike accident सावळेश्वर येथे दुचाकीचा अपघात; तरुण पुतण्या ठार, चुलता जखमी

Surajya Digital
Last updated: 2023/03/21 at 8:25 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● काम करण्यास अडवणूक केल्याप्रकरणी सेवानिवृत्त फौजदारासह चौघांवर गुन्हा● भाडे मारल्याचा राग मनात धरून फायटरने मारहाण; चौघांवर गुन्हा

सोलापूर : अनोळखी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील तरुण ठार तर त्याचे चुलते गंभीर जखमी झाले. हा अपघात पुणे महामार्गावरील सावळेश्वर नजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर सोमवारी (ता.20) दुपारच्या सुमारास घडला. Bike accident at Savleshwar;
Young nephew killed, cousin injured Solapur Sawant

 

गोपाळ महादेव सावंत (वय २४ रा. वाकाव ता. माढा) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे चुलते ज्ञानेश्वर तुकाराम सावंत (वय ३६ रा. वाकाव) हे जखमी झाले. गोपाळ सावंत आणि ज्ञानेश्वर सावंत हे दोघे सोमवारी दुपारी मोहोळ ते सोलापूर असा दुचाकीवरून प्रवास करीत होते. सावळेश्वर येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ चारच्या सुमारास अनोळखी वाहनाच्या धडकेने दोघेही जखमी झाले होते. त्यांना अॅम्बुलन्समधून त्वरित सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता गोपाळ सावंत हा उपचारापूर्वी मयत झाला.

 

मयत गोपाळ सावंत हा अविवाहित असून तो बार्शी येथील कॉलेजमध्ये शिकण्यास होता. त्याच्या पश्चात आई- वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. तो चुलत्यासोबत सोलापुरात चारचाकी वाहनाची नोंदणी करण्यासाठी येत होता. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे दोघे जवळचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● काम करण्यास अडवणूक केल्याप्रकरणी सेवानिवृत्त फौजदारासह चौघांवर गुन्हा

 

सोलापूर : काम करण्यास अडवणूक केल्याप्रकरणी सेवानिवृत्त फौजदारासह चार जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हि घटना दि.२० मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सीएनडी वेस्ट प्रोजेक्ट शेळगी येथे घडली.

 

याप्रकरणी राधाकृष्णन रामस्वामी अय्यर (वय-५३, व्यवसाय- चीप एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, रा.गुलमोहर अपार्टमेंट वसंत विहार सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून भीमराव लक्ष्मण चव्हाण व त्यांचा मुलगा, पाटील वकील तसेच सेवानिवृत्त फौजदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 

फिर्यादी अय्यर हे सीएनडी वेस्ट प्रोजेक्ट शेळगी सोलापूर येथे जेसीबी काम करण्यास आणला असताना,वरील संशयित आरोपी यांनी तेथे येऊन येथे काम करायचे नाही, तू येथे कसा काम करतो ते बघतो म्हणून काम करत असताना अडवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार नाईकवाडी हे करीत आहेत.

 

● भाडे मारल्याचा राग मनात धरून फायटरने मारहाण; चौघांवर गुन्हा

 

सोलापूर : मार्केट यार्ड येथे गाडी भाडे मारल्याचा राग मनात धरून हाताने मारहाण करत फायटरने कपाळावर मारून जखमी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

ही घटना दि.१९ मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान पासपोर्ट ऑफिस समोर मार्केट यार्ड येथे घडली. याप्रकरणी नागनाथ रामचंद्र दिंडोरे (वय-२९,रा. मुपो. करजगी, ता. अक्कलकोट) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून सिद्धू स्वामी,मल्लू स्वामी (रा.बागवान नगर) यांच्यासह इतर दोन अनोळखी इसमानविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पटेल हे करीत आहेत.

 

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Bike #accident #Savleshwar #Young #nephew #killed #cousin #injured #Solapur #Sawant, #सोलापूर #सावळेश्वर #दुचाकी #अपघात #तरुण #पुतण्या #ठार #चुलता #जखमी #सावंत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संजयमामा अजितदादांच्या मागे बबनदादा फडणविसांच्या मागे
Next Article सोलापूर । शालेय पोषण आहारात सापडला कुपोषण करणारा प्लॅस्टिकचा तांदुळ

Latest News

Gentle Monster Jennie Kpop Sunglasses Up to 30% Off
Top News December 6, 2025
test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?