Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘दुआओ मे याद रखना’ म्हणत तिने मरणाला कवटाळले; अनेकांकडून हळहळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

‘दुआओ मे याद रखना’ म्हणत तिने मरणाला कवटाळले; अनेकांकडून हळहळ

Surajya Digital
Last updated: 2021/03/01 at 10:01 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अहमदाबाद : येथील तरूणीने हसत-हसत मरणाला कवटाळले. आएशा या तरूणीने साबरमती नदीवरील रिव्हरफ्रंट वॉक वे ब्रीजवरून उडी मारत आत्महत्या केली. त्याआधी तिने एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आत्महत्या करण्याआधीही तिच्या चेहऱ्यावर हसू दिसत होते. तिचे हेच हसू सर्वांच्या डोळ्यात पाणी देऊन गेले. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समजते.

माझं आयुष्य एवढंच होतं. मी करते आहे त्याला कुणीही जबाबदार नाही. माझ्या इच्छेने मी हे करत आहे, अस हसत हसत सांगतानाचा तिने अपलोड केला आणि तिथल्या तिथे नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.अहमदाबादमध्ये या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. गुजरातमधील अहमदाबादच्या साबरमती नदीत उडी मारून विवाहितेने स्वतःल संपवलं. उडी मारण्यापूर्वी तिने सेल्फी मोडवर केला आणि तो अपलोडही केला.

या व्हिडीओत ती विवाहिता म्हणते, ‘माझं नाव आयेशा अमीर खान आहे. मी आज जे काही करत आहे. ते माझा इच्छेने करत आहे. माझावर कोणाचाही दबाव नाही. यासाठी कोणालाही जबबदार धरू नये. समजून जा की माझ आयुष्य इथपर्यंतच होत.मला जितकं आयुष्य मिळालं ते खूप सुखी होतं. त्याचबरोबर ती वडिलांना म्हणते’ केस सोडून द्या किती वेळ आणि किती लढणार?’.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दोन मिनिटांच्या व्हिडीओत तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्य नेटकऱ्यांना भावूक करत आहे. आपली ओळख करुन देताना आयेशा आपल्या मनातील
दु:ख बोलून दाखवत आहे. “मी जे काही करण्यासाठी जात आहे त्यासाठी माझ्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही. देवानेच आपल्याला इतकंच आयुष्य दिलं होतं असं समजा,” असं आयेशा सांगताना दिसत आहे.

* ‘जन्नत मिले न मिले’, चलो अलविदा’

पुढे ती असं म्हणते, “प्रेमच करायचं असेल तर दोन्हीकडून करा एकतर्फी प्रेमातून काहीच साध्य होत नाही. लग्नानंतर सुद्धा प्रेम अपूर्णच राहतं. ही नदी मला आपल्यात सामावून घेईल. मला वाहत राहायचं आहे. मी एखाद्या हवेसारखी आहे. मला ज्यांना ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या मी सांगितल्या आहेत. आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. मी गेल्यानंतर जे काही होईल त्याच्या जास्त गाजावाजा करू नका. दुआमें याद रखना,’जन्नत मिले न मिले’.चलो अलविदा”, असं म्हणत या तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

* पैसे देऊनसुद्धा हुंड्यासाठी छळ

ही विवाहिता अहमदाबाद येथे राहत होती. तिचं नाव आयेशा लियाकत अली असं होतं. तिच्या वडिलांनी याबाबत बोलताना म्हटल आहे. आयेशाचा 2018 मध्ये राजस्थान मधील ‘जालोर’ येथील अमीर अली याच्याशी विवाह झाला होता. मात्र आयेशाचा हुंड्यासाठी तिच्या सासरकडून सतत छळ होत होता. आम्ही पैसे देऊनसुद्धा हा छळ काही थांबला नव्हता. त्यांची पैशांची हाव सतत वाढतच होती. काही महिन्यांपूर्वी अमीर आयेशाला अहमदाबादला सोडून गेला होता.

आयेशांच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार अमीर आयेशाचा फोनसुद्धा उचलत नव्हता, किंवा फोनचं उत्तरही देत नव्हता. काही दिवसांपूर्वी रागात आयेशाने अमीरला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. तेव्हा अमीरने ‘जाऊन मर’ असं उत्तर दिलं होत. आणि त्यांनतर आज अखेर आयेशाने ही गोष्ट खरी करून दाखवली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

आयेशाचा मृतदेह पोलिसांना सापडला असून याप्रकरणी तिच्या पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #Saying #Duaomeyaadrakhna #she #embraced #death #Hulledbymany, #दुआओमे #यादरखना #म्हणत #मरणाला #कवटाळले #अनेकांकडून #हळहळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लस घेताना पंतप्रधान मोदी असं काही म्हणाले की सर्वजण हसले
Next Article इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आमदारांचा सायकल मोर्चा काढून निषेध

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?