Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आपल्या 54 लाख निवृत्तीवेतन धारकांसाठी ‘या’ बँकेने आणली विशेष योजना, वाचा सविस्तर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थ

आपल्या 54 लाख निवृत्तीवेतन धारकांसाठी ‘या’ बँकेने आणली विशेष योजना, वाचा सविस्तर

Surajya Digital
Last updated: 2020/07/27 at 8:46 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 54 लाख निवृत्तीवेतन धारकांसाठी विशेष एसबीआय पेन्शन सेवा सुरू केली आहे. एसबीआयकडे पेन्शन खाते असलेल्या निवृत्तीवेतन धारकांना ही सुविधा उपलब्ध असेल.

एसबीआयकडे पेन्शन खाती असलेले पेन्शनर्स एसबीआय पेन्शन सेवा वेबसाइट सुरु केली आहे. एसबीआय पेन्शनसेवा वेबसाइट वापरणे सोपे आहे आणि सामान्य पेन्शनधारकांना त्याचा फायदा होईल. एसबीआय कडून निवृत्तीवेतन मिळविणारे निवृत्तीवेतनधारक एसबीआय पेन्शन सेवेच्या संकेतस्थळावर लॉग इन करू शकतात आणि आपल्या निवृत्तीवेतनाशी संबंधित तपशील त्वरित तपासू शकतात.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

* या कोरोनाच्या महामारीत सर्वात जास्त प्रभाव ज्येष्ठ नागरिकावर झाला आहे. मृत आणि बाधितांमध्ये सर्वात जास्त संख्या वृध्द लोकांची आहे. त्यामुळे त्यांना बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे या सोयीचा चांगला फायदा होणार आहे. जरी यांना इंटरनेट, मोबाईल चालवता येत नसले तरी घरातील कोणाकडून तरी मदत घेऊन या सोयीचा निश्चित फायदा घेऊ शकतील.

* पेन्शन सेवेवर मिळतील या सुविधा

एसबीआय पेन्शनसेवा ही एक वेबसाइट आहे जिथे एसबीआय पेन्शनर्स लॉगइन करू शकतात आणि पेन्शनशी संबंधित तपशील त्वरित पाहू शकतात.

या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सेवांमध्ये एरियर कॅल्क्युलेशन सीट आणि पेन्शनस्लिप/ फॉर्म 16 डाउनलोड करणे, पेन्शन प्रोफाइल तपशील व गुंतवणूकी संबंधित तपशील, जीवन प्रमाणपत्राची स्थिती व व्यवहाराचा तपशील यांचा समावेश आहे.

* नोंदणी अशी करा

एसबीआयकडे पेन्शन खाती असलेले पेन्शनर्स एसबीआय पेन्शन सेवा वेबसाइट https://www.pensionseva.sbi/WebPages/Login/PendererRegifications.aspx वर नोंदणी करू शकतात. नवीन पेंशनधारकाची नोंदणी करण्यासाठी युजर-आयडी, पेन्शन खाते क्रमांक, जन्मतारीख, पेन्शन भरणा शाखा कोड, शाखेत सबमिट केलेली समान ई-मेल आयडी आवश्यक असते.

निवृत्तीवेतनधारकांना एसबीआय पेन्शन सेवा वेबसाइटवर विस्तारित लाभ देखील मिळतील. कोणते लाभ मिळतील ते जाणून घेऊया –

– मोबाइल फोनवर पेन्शन देय तपशिलाचा एसएमएस अलर्ट

– ईमेल / पेन्शन पेमेंट शाखेच्या माध्यमातून पेन्शन स्लिप

– स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत लाइफ प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा

– जीवनप्रमाण (JeevanPramaan) ची सुविधा शाखांमध्ये उपलब्ध

– ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

– संरक्षण / रेल्वे / सीपीएओ / राजस्थान निवृत्तीवेतनधारकांसाठी ईपीपीओची तरतूद.

You Might Also Like

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

ठाकरे सरकार, मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

TAGGED: #निवृत्तीवेतनधारक #विशेषयोजना #एसबीआय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाला पळवण्यासाठी दररोज पाच वेळा हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आवाहन
Next Article तुम्ही इतर वृत्तवाहिनीला मुलाखती देऊन दाखवा; उपमुख्यमंञ्यांन फेल ठरवण्याचा प्रयत्न

Latest News

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देश - विदेश August 18, 2025
‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर
देश - विदेश August 18, 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण
महाराष्ट्र August 18, 2025
सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस
सोलापूर August 18, 2025
शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर August 18, 2025
सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब
सोलापूर August 18, 2025
बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?