Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जीपच्या धडकेतील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, आश्रम शाळेच्या कर्मचार्‍याने घेतले पेटवून
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

जीपच्या धडकेतील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, आश्रम शाळेच्या कर्मचार्‍याने घेतले पेटवून

Surajya Digital
Last updated: 2021/09/01 at 9:31 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मंगळवेढा : भाळवणी येथून हाजापूरकडे निघालेल्या मोटर सायकलस्वाराने जीपला धडक दिल्याने  डोकीस मार लागून जखमी होवून उपचारादरम्यान प्रकाश गणपती वाडेकर(वय 39 रा. भाळवणी) याचा मृत्यू झाला असून या घटनेची मंगळवेढा पोलिसात नोंद झाली आहे.

या घटनेची हकिकत अशी,यातील मयत प्रकाश वाडेकर हे दि. 8 रोजी दुपारी 3.00 वा भाळवणी येथून हाजापूरकडे मोटर सायकलवरून जात असताना स्वामी यांचे वस्तीजवळ समोरून येणार्‍या जीपला धडकल्याने डोक्याला मार लागून जखमी झाल्याने प्रथमतः मंगळवेढ्यात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारासाठी सोलापूर येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. उपचार सुरु असतानाच तो मयत झाला असल्याची खबर डॉ.पल्लवी मेहता यांनी पोलिसात दिली असून अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.

* येड्राव येथील आश्रम शाळेच्या कर्मचार्‍याने घेतले पेटवून 

मंगळवेढा : येड्राव येथील शाहू शिक्षण संस्था अंतर्गत माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनिअर कॉलेजने  डोनेशनच्या नावाखाली 2 लाख रुपये घेतल्याने  झालेल्या अन्यायाविरूध्द प्रकाश गोरख करडे (रा.येड्राव) याने अंगावर रॉकेल ओतून घेवून पेटवून घेतले. यात आत्महत्या  करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या कर्मचार्‍याविरूध्द पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील आरोपी प्रकाश करडे हा येड्राव येथील आश्रम शाळेत कामाला आहे.संस्थेने विनाअनुदानितवर काम करून घेवून डोनेशनच्या नावाखाली 2 लाख रुपये घेतले.या झालेल्या अन्यायाविरूध्द आरोपीने आत्मदहन करण्याचा इशारा दि. 30 रोजी सकाळी 10.30 च्या दरम्यान शाळेच्या गेटसमोर दिला होता. या प्रमाणे त्याने अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिस शिपाई मळसिध्द कोळी याने दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.वि.सं.कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार सुनिल गायकवाड हे करीत आहेत.

You Might Also Like

पंढरपूरात चंद्रभागेची पातळी इशारा सीमेला; सर्व घाट बंद, आठ बंधारे पाण्याखाली

सोलापूर जिल्ह्यात 1688 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार

सोलापुरातील 96 बेकायदा बांधकामांची यादी महापालिकेकडून जाहीर, नामवंत बिल्डर आणि नागरिकांचा समावेश

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन होणार – उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

सोलापूरचे सीईओ कुलदीप जंगम 15 दिवसांसाठी जिल्हाधिकारी पदाची धुरा सांभाळणार

TAGGED: #Two-wheeler #killed #jeep #accident #ashram #self-immolation, #जीपच्या #धडकेतील #अपघातात #दुचाकीस्वाराचा #मृत्यू #आश्रमशाळेच्या #कर्मचार्‍याने #आत्मदहन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोन्याचा वडापाव; किंमत २००० रूपये
Next Article गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे, हायकोर्टाची सूचना

Latest News

शैलेश जेजुरीकर पीॲंडजीचे पुढचे सीईओ
Top News देश - विदेश July 30, 2025
मुंबई विद्यापीठाचा निर्णय: विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेण्याची संधी
महाराष्ट्र July 30, 2025
“परभणी जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा भक्कमपणे उभी करा” – हर्षवर्धन सपकाळ यांचा कार्यकर्त्यांना संदेश
राजकारण July 30, 2025
भारतावर २० ते २५ टक्के टॅरिफ लागू होण्याची शक्यता – डोनाल्ड ट्रम्प
देश - विदेश July 30, 2025
निवडणुकीसाठी मुदतवाढ मागणार : सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात अर्ज
Top News July 30, 2025
सुशांतसिंग राजपूत प्रकरण : सीबीआय क्लोजर रिपोर्टवर रिया चक्रवर्तीला न्यायालयाची नोटीस
महाराष्ट्र July 30, 2025
शिवराज्याभिषेक दिन हा देशातील सर्वात मोठा उत्सव असावा – संभाजी भिडे
महाराष्ट्र July 30, 2025
जम्मू-काश्मीर : पूंछमध्ये चकमक, लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार
देश - विदेश July 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?