Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शाळांच्या वेळापत्रकात बदल; आता शाळा सकाळी ७ ऐवजी ९ वाजता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शाळांच्या वेळापत्रकात बदल; आता शाळा सकाळी ७ ऐवजी ९ वाजता

admin
Last updated: 2025/06/11 at 3:46 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 11 जून (हिं.स.) पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शाळा येत्या १६ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळा सुरू होण्यापूर्वी तयारी सुरू केली आहे. शाळेसाठी नवीन दप्तर, वॉटर बॉटल, वह्या, पुस्तक खरेदी करणं सध्या सुरू आहे. अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांचे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता शाळा सकाळी सात ऐवजी ९ वाजता सुरू होणार आहे.

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची सुरूवात येत्या १६ जूनपासून होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शाळा सकाळी ७ ऐवजी ९ वाजता भरतील आणि सायंकाळी ४ वाजता सुटतील. म्हणजेच सकाळी ९ ते सायंकाळी ४ ही शाळेची वेळ असणार आहे.

शाळांच्या नव्या वेळापत्रकानुसार, सकाळी ९ वाजल्यापासून ते ९.२५ पर्यंत परिपाठ राहिल. ९.२५ ते ११.२४ पर्यंत सुरूवातीचे ३ लेक्चर होतील. ११.२५ पासून ते ११.३५ पर्यंत १० मिनिटांची छोटी सुट्टी असेल. ११.३५ ते १२.५० पर्यंत दोन लेक्चर होतील. १२.५० ते १.३० वाजेपर्यंत मधली सुट्टी होईल. त्यानंतर १.३० ते ३.५५ वाजेपर्यंत उर्वरित लेक्चर होतील. त्यानंतर शेवटच्या ५ मिनिटांमध्ये वंदे मारतम होईल आणि शाळा सुटतील.

दरम्यान, राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहे. उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या असून आता लवकरच शाळा सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे. तर सीबीएसई बोर्डाची शाळा येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. राज्यातील ११ जिल्हे वगळता सगळीकडे शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भामध्ये इतर विभागांच्या तुलनेत थोड्या उशिराने शाळा सुरू केल्या जातात.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा; अमरावतीत 14 जूनला आंदोलन
Next Article अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस; बच्चू कडू यांची प्रकृती खालावली

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?