Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंगळवेढ्यात ट्रॅक्टरच्या धडकेत शाळकरी विद्यार्थी ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मंगळवेढ्यात ट्रॅक्टरच्या धडकेत शाळकरी विद्यार्थी ठार

Surajya Digital
Last updated: 2022/02/24 at 9:26 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

सोलापूर – वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेने सायकलवरील विद्यार्थी गंभीर जखमी होऊन मरण पावला. हा अपघात नागणेवाडी (ता.मंगळवेढा) येथे काल बुधवारी दुपारच्या सुमारास घडला.

या प्रकरणाची फिर्याद सनतकुमार थिटे यांनी दिली. कृष्णा सनतकुमार थिटे (वय १४ रा. फुगारेगल्ली, मंगळवेढा) असे मयताचे नाव आहे. तो काल दुपारी १ वाजेच्या सुमारास शाळेतून घराकडे सायकलवरून निघाला होता.दामाजी रोड वरील श्रीजल पाणी फिल्टर जवळ पाठीमागून ट्रॅक्टर धडकल्याने तो गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वी मरण पावला. या अपघाताची नोंद मंगळवेढा पोलिसात झाली. पोलीसांनी अपघातानंतर ट्रॅक्टर सोडून पसार झालेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. फौजदार शेटे पुढील तपास करीत आहेत.

मयत मुलगा कारखाना रोडवरील ज्ञानदीप स्कूलमध्ये इयत्ता ८ वी च्या वर्गात शिकत असून दुपारी दीड वाजता शाळेतून परत घरी रेंजर सायकलवरून येत असताना नागणेवाडी येथील श्रीजल पाणी फिल्टरच्या समोर ऊसाने भरलेल्या लाल रंगाच्या बिगर नंबरच्या महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी होवून मयत झाला.

फिर्यादी यास एकच मुलगा असल्याने काळाने त्याच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याची फिर्याद वडील सनतकुमार थिटे यांनी दिल्यावर अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. A schoolboy was killed when a tractor hit him manngalwed 

 

■ भंगार विक्रेत्याला मारहाण करून रोकड लुटली दोघांविरुद्ध गुन्हा

सोलापूर – आमच्याकडे भंगार आहे चल तुला देतो असे सांगून त्याला मारहाण करीत खिशातील मोबाईल आणि ५ हजार रुपये रोख  लुटून नेल्याची प्रकरणी लुटून नेल्याची घटना नजीक पिंपरी (ता.मोहोळ) येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास  घडली. या प्रकरणात मोहोळच्या पोलीस आणि पल्सर मोटरसायकल वरील दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

शिवकुमार रामविलास गौतम (रा.मोहोळ) हा तरुण नजीक पिंपरी येथे सायकल वरून भंगार गोळा करीत होता. सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरील दोघा अनोळखी तरुणांनी आमच्याकडे भंगार आहे. असे म्हणून त्याला काही अंतरावर नेले. त्यानंतर त्याला मारहाण करून खिशातील मोबाईल आणि रोकड लुटून पसार झाले. अशी नोंद पोलिसात झाली. फौजदार माने पुढील तपास करीत आहे .

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

■ सोनाराच्या दुकानातून लाखाची सोनसाखळी लंपास करणाऱ्या दोघांना अटक

मोहोळ : जोडवे दाखवा असा बहाणा करून मोहोळ येथील एका सरफाच्या दुकानातुन दोन महिला व दोन पुरुषांनी सरफाला बोलण्यात गुंतवून सोन्याची चेन लंपास केल्याची घटना घडली होती दरम्यान मोहोळ पोलिसांच्या पथकाने या चोरी प्रकरणी एका महिलेसह इसमाला पकडले व एक लाख रुपये किमतीची सोन्याची चैन हस्तगत केली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ शहरातील समाधान शिवाजी काकडे यांचे सोन्या-चांदीचे सराफ दुकान आहे  दिनांक २१ फेब्रुवारी रोजी चार वाजण्याच्या दरम्यान नवजीत विनोद वाणी रा खर्डा ता जामखेड जि अहमदनगर व ज्योस्ना सुरज कचवाई रा. व्ही. आय. टी कॉलेज समोर पुणे, अजय साळुंखे, स्नेहा चव्हाण दोघेही रा. पारे ता सांगोला असे चार जण मिळून काकडे यांच्या सराफ दुकानात जोडवे घेण्याच्या बहाण्याने ग्राहक बनून गेले होते. त्यावेळी त्यातील एका महिलेने सोन्याची चैन दाखवा असे सांगितले.

सराफ व्यापाऱ्याने चैन दाखवल्यानंतर त्यातीलच एका महिलेने हात चलाखी करत एक सोन्याची चैन लपवून ठेवली, ही बाब सराफ व्यापाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने लगेच माझी एक चैन गायब झाल्याचे म्हणताच एक स्त्री व पुरुष त्या दुकानातून पळून गेले त्यांच्या सोबतच्या एका स्त्री व पुरुषाला याबाबत विचारणा केली असता त्यांचा आमचा काही संबंध नाही असे म्हणून तेही तिथून निघून गेले. सराफ व्यापाऱ्यासह चौघांनी जोडवे पाहण्यासाठी आलेल्या स्त्री व पुरुषांचा पाठलाग केला असता ते दोघे जण आठवडा बाजरापासून चंद्रमौळी एम आय डी सी चौकापर्यंत रिक्षातुन गेले होते.

याबाबत सराफ व्यापाऱ्याने पोलिसांना बोलावून घेऊन त्या स्त्री व पुरुषाला पकडून दिले पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता नवजीत वाणी व ज्योस्ना कचवाई अशी नावे सांगीतली व पळून गेलेल्या मध्ये अजय साळुंखे, स्नेहा चव्हाण असल्याचे सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी पळून जाणाऱ्या नवजीत वाणी याला पकडले तर चोरून ठेवलेली सोन्याची चैन ज्योत्स्ना कचवाई हिच्याकडून हस्तगत केली. पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉ अमोल घोळवे, निलेश देशमुख, अनुसया बंडगर, मालती नागरे, सचिन माने, प्रवीण साठे, सिद्धू मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

You Might Also Like

सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात

सोलापूर विद्यापीठाची परीक्षा १४ ऑक्टोबरपासून!

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

सोलापूरमधील व्यापार्‍याची दोन लाख 23 हजारांची ऑनलाईन फसवणूक

सोलापूर – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सीओईपीतील नव्या इमारतीचे उद्घाटन

TAGGED: #schoolboy #killed #tractor #hit #manngalwed, #मंगळवेढा #ट्रॅक्टर #धडक #शाळकरी #विद्यार्थी #ठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, महावितरणचे कार्यालय पेटविले
Next Article भारताने मदत करावी, युक्रेनची विनंती; युक्रेनमध्ये अडकलेल्या मराठी मुलाची मदतीसाठी हाक

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?