Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/07/25 at 11:24 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

□ माळशिरस तालुक्यातील गिरझणी तलावावर घडली

 

Contents
□ माळशिरस तालुक्यातील गिरझणी तलावावर घडली□ विष प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यूस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ मोटारीला धडकल्याने दुचाकीवरील दोघे जखमी□ सिद्धेश्वर मंदिराजवळ रॉडने तरुणास मारहाण□ कर्जास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

माळीनगर : माळशिरस तालुक्यातील गिरझणी तलावाच्या धबधब्यावर मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या शुभम जठार (रा. शंकरनगर ,गवळीवस्ती) या 18 वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यु झालेची घटना रविवारी ( दि. 24 जुलै) घडली आहे. A schoolboy who went for a trip to the waterfall drowned in Malshiras

सदर घटना अपघात की घातपात याबाबत अजुन स्पष्टीकरण झाले नसले तरी या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे शंकरनगर ( स्वरूपनगर, गवळ वस्ती) येथे राहणारा मुलगा शुभम भारत जठार हा आपल्या मित्रांसोबत गिरझणी येथिल तलावाच्या धबधब्यावर पर्यटनासाठी गेला होता.

धबधब्यात मित्रांसोबत मौज-मजा करत फोटो काढत असताना या दरम्यान शुभम व त्याच्या मित्राचा पाय घसरल्याने दोघेही धबधब्यावरून घसरत धबधब्याच्या पायथ्याशी असणाऱ्या डोहात पडले. तिथे उपस्थित इतराच्या लक्षात येताच त्यांनी डोहाकडे जावून दोघांना बाहेर काढले.

बाहेर काढल्यावर शुभमच्या हालचाली मंदावल्याचे जाणवल्याने त्याला उपचारासाठी हलवले. परंतु शुभमचा मृत्यु झाल्याचे कळाले. घसरून पाण्यात पडलेल्या दोन्ही मुलांना पोहता येत नव्हते, अशी माहिती नातेवाईकांकडून समजली.

या घटनेत मयत झालेला शुभम भारत जठार हा शंकरनगर येथील महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेत 12 वी चे शिक्षण घेत होता. तरुण वयातील मुलांच्या अकस्मात मृत्यूमुळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला तर या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. नातेवाईक व मित्रांनी शुभमच्या मृत्युची खबर अकलूज पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून पुढील कारवाई केली.

 

□ विष प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

 

सोलापूर – राहत्या घरात विष प्राशन केलेली सुवर्ण अशोक शिंदे (वय ३५ रा. ए.जी.पाटील नगर, जुळे सोलापूर) ही विवाहिता उपचारादरम्यान रविवारी (ता. 24) पहाटे मरण पावली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास तिने राहत्या घरात हा प्रकार केला होता. अशोक शिंदे (पती) यांनी तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान ती आज मरण पावली. विजापूर नाका पोलिसात याची नोंद झाली असून यामागचे कारण समजले नाही.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ मोटारीला धडकल्याने दुचाकीवरील दोघे जखमी

सोलापूर : मोहोळ ते सोलापूर मार्गावरील चंदन नगर पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोटारीला पाठीमागून धडकल्याने दुचाकी वरील मोहन शांतप्पा सुतार (वय ३२) आणि दगडू बंडू लोकरे (दोघे रा.पंढरपूर) हे जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारच्या सुमारास घडला. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते दोघे पंढरपूर ते सोलापूर असा प्रवास करीत होते. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

□ सिद्धेश्वर मंदिराजवळ रॉडने तरुणास मारहाण

सोलापूर : सिद्धेश्वर मंदिरासमोरील पान टपरी जवळ लोखंडी रोडने केलेल्या मारहाणीत ऋतुराज संजय घोडके (वय १९ रा.मोदीखाना) हा तरुण जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋतुराज हा आपल्या भावासोबत थांबला होता. त्यावेळी रोहन खेडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण केली. अशी नोंद सदर बाजार पोलिसात झाली आहे.

□ कर्जास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

पाकणी (ता.उत्तर सोलापूर) येथे लोकांचे पैसे देणे न झाल्याच्या कारणावरून बसवराज विजयकुमार बाळे (रा. शिवाजीनगर बाळे. मूळ रा.सुलेरजवळगा) याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी माधव जाधव (मित्र) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे.

 

 

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #schoolboy #went #trip #waterfall #drowned #Malshiras, #धबधबा #पर्यटन #शाळकरी #मुलाचा #पाण्यात #बुडून #मृत्यू #माळशिरस #
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोट एसटी अपघात 35 पेक्षा अधिक जखमी, सहाजणांना फ्रॅक्चर
Next Article पोलीस निरीक्षक संजय साळुंखेंना ठोठावला कोर्टाने दोन लाखांचा दंड

Latest News

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा – राज्यपाल
महाराष्ट्र May 30, 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती – एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन
महाराष्ट्र May 30, 2025
नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक
देश - विदेश May 30, 2025
भंडाऱ्यात लुटणाऱ्या चौघांना अटक
महाराष्ट्र May 30, 2025
गोंदियात इलेक्ट्रिक खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद, ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र May 30, 2025
नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान
देश - विदेश May 30, 2025
राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद
महाराष्ट्र May 30, 2025
पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर
देश - विदेश May 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?