Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उन्हाळा सुट्टीतही सोलापुरात सुरु राहणार शाळा; फक्त 15 दिवस सुट्टी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

उन्हाळा सुट्टीतही सोलापुरात सुरु राहणार शाळा; फक्त 15 दिवस सुट्टी

Surajya Digital
Last updated: 2021/03/10 at 1:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : कोरोनामुळे राज्यातील शाळा अनेक दिवस बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली आहे. ती भरून काढण्यासाठी मे महिन्यात दोन तासांची शाळा भरवली जाणार आहे. त्यामुळे यंदा शिक्षकांना फक्त 15 दिवसांची उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी ही माहिती दिली. दरम्यान, दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून उन्हाळी सुट्टी दिली जाते.

एकीकडे राज्यभरात कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाच दुसरीकडे सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक धाडसी निर्णय घेतला आहे. कारण लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षणाला सामोरे जावे लागले होते. तर त्यापैकी अनेकजण हालाकीची परिस्थिती आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे शिक्षणापासून वंचित राहिले होते. नेमकी तीच कमतरता हेरत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे वर्ग भरवण्याचा निर्णय घेतला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जूनच्या कालावधीत उन्हाळी सुट्टीची तरतूद केली आहे. मात्र यंदाच्या वर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून शिक्षकांना केवळ 15 दिवसांचीच सुट्टी देण्यात येणार आहे.

लॉकडाउनमुळे राज्यासह जिल्हाभरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. मात्र या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणच घेता आले नाही. त्यामुळेही विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मे महिन्यात शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे अॉनलाईन शिक्षण दिले असूनही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करून दररोज दोन तसाचा वर्ग भरविण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांना आपल्या सुट्ट्यांवर पाणी सोडावे लागणार आहे. कोरोना काळात सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देत आपापल्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले आहे. परंतु, कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘काँग्रेसमध्ये असतानाच एवढी चिंता राहुल गांधीना असती, तर…; सिंधियांनी राहुल गांधींना लगावला टोला
Next Article अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग प्रस्ताव, सचिन वाझे सरकारचा जावई आहे का?’

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?