□ विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी जि. प. प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 43 शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चालल्याने त्या बंद होणार की काय, अशी शंका पालक वर्गात होत असून त्या पूर्ववत सुरू राहावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. 43 ZP schools in Solapur, Patsankhya district on the verge of closure
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने जिल्हा परिषद प्रशासनात विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी पुरवून त्या विद्यार्थ्यांना मुख्य शालेय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. काही शाळा घरापासून दूर आहेत. काहींचे आर्थिक परिस्थिती वाईट आहे तर काही पालकांना मुलांना शाळेत शहरात शिकवण्यासाठी ओढ आहे, अशा अनेक कारणाने जिल्हा परिषदेच्या शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे.
त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या शाळा केवळ पटसंख्या कमी असल्याने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. खाजगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा शिकण्याचा ओढा मोठा असून अनेक विद्यार्थी प्रायव्हेट शाळेतच शिक्षण घेण्याचे पसंत करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेला विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता ते म्हणाले ज्या शाळेचे पटसंख्या कमी आहे त्या शाळा बंद पडणार नाहीत मात्र तेथील पटसंख्या एक ते दहा कमी असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळेत वर्ग करण्यात येईल.
जिल्ह्यातील एकूण पटसंख्या कमी झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांचे संख्या याप्रमाणे वाडी वस्त्यांवर असलेले एकूण 337 विद्यार्थी आहेत. यात अक्कलकोट तालुक्यासह शाळा 51 विद्यार्थी बार्शी तालुका तीन शाळा तीस विद्यार्थी करमाळा सहा शाळा 45 विद्यार्थी माढा सहा शाळा ५५ विद्यार्थी माळशिरस आठ शाळा 46 विद्यार्थी मंगळवेढा एक शाळा आठ विद्यार्थी मोहोळ चार शाळा 32 विद्यार्थी पंढरपूर चार शाळा 39 विद्यार्थी सांगोला पाच शाळा 31 विद्यार्थी असे एकूण 337 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे.
□ दीड महिने होऊनही मुले गणवेशाविना
शाळेच्या पहिल्याच दिवशी गोरगरिब मुलांना मोफत गणवेश द्यावेत, असे सरकारचे आदेश होते. मात्र, १५ जूनपासून शाळा सुरु होऊन आता दीड महिने झाले, पण त्या मुलांना गणवेश मिळालेच नाहीत. त्यामुळे हातावरील पोट असलेल्यांची एक लाख ४८ हजार ४०५ विद्यार्थी (पहिली ते आठवी) जुन्याच कपड्यांवर शाळेत येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलांसह अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना हे मोफत गणवेश दिले जातात. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९७ तर महापालिका, नगरपालिकांच्या ७५ शाळांमधील जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन, या प्रमाणे तीन लाख गणवेश मिळणे अपेक्षित आहेत.
तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी पापरी (ता. मोहोळ) येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी एका चिमुकलीकडे गणवेशाबद्दल विचारपूस केली. त्यावेळेस गणवेश मिळाले नसल्याचे सांगितले.