Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कॅन्सरमुळे जवळची माणसं गमावलेल्या शास्त्रज्ञाने शोधले सेंद्रीय खत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

कॅन्सरमुळे जवळची माणसं गमावलेल्या शास्त्रज्ञाने शोधले सेंद्रीय खत

Surajya Digital
Last updated: 2023/01/25 at 6:05 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ माळशिरस तालुक्यातील दसूर च्या शेतकऱ्याकडे गव्हावर प्रयोग□ उत्तर भारतीयांची मक्तेदारी मोडीत, जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात करतील■ संशोधनाची किमयास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ माळशिरस तालुक्यातील दसूर च्या शेतकऱ्याकडे गव्हावर प्रयोग

□ उत्तर भारतीयांची मक्तेदारी मोडीत, जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात करतील

सोलापूर – सोलापुरी चादरी आणि कडक भाकरीसाठी राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात ज्वारीचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते.  Scientist who lost loved ones to cancer discovers organic fertilizer Malshiras Research Alchemy पण, सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात मोठया प्रमाणावर करतील, असं तुम्हाला सांगितलं तर… तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे शक्य आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील दसूर येथील शेतकरी सुभाष कागदे यांच्या शेतात याबाबतचा प्रयोग देखील सुरू आहे.गुजरातमधल्या सुरतचे डॉ. सलीम चेन्नीवाला यांनी त्यांच्या प्रदीर्घ संशोधनातून ‘जैनम चरखा’ आणि ‘क्रांती’ या सेंद्रीय खताची निर्मिती केली आहे. सेंद्रीय शेतीचा पर्याय अवलंबला तर येत्या काळात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी देखील आपल्या गव्हाची निर्यात देशभर करू शकतात. गव्हाच्या निर्यातीमध्ये उत्तर भारतामधील राज्यांची मक्तेदारी आहे. बाहेरच्या देशामध्येही याला मोठी मागणी आहे. उत्पादन वाढीच्या शर्यतीमध्ये हे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करून जमीनीचा कस आणि आरोग्यास धोका निर्माण झाले आहेत.

■ संशोधनाची किमया

 

माळशिरस तालुक्यातील दसूर या गावातील शेतकरी सुभाष कागदे यांनी या सेंद्रिय खताची चाचणी घेण्यासाठी त्यांच्या शेतात दोन भाग केले. त्यापैकी एक एकरमध्ये त्यांनी रासायनिक खत टाकून गहू लावला. त्याला अद्याप लोंब्या आल्या नाही आणि वाढही झाली नाही तर चार एकर मध्ये ‘जैनम चरखा’ आणि ‘क्रांती’ या खताचा वापर केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

एकाच दिवशी लावलेल्या या दोन्ही पिकांपैकी सेंद्रीय खत वापरलेला गहू या पिकाला आता मोठ्या लोंब्या पाहायला मिळत आहेत. रासायनिक प्रकारे पिकवलेल्या गव्हामध्ये अजूनही हा बदल झालेला नाही. डॉ. सलीम चेन्नीवाला यांनी मोठ्या संशोधनानंतर जैनम चरखा आणि क्रांती हे प्रॉडक्ट बनवलंय.

अनेक वर्षांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी या जोरावर त्यांनी बनवलेलं हे प्रॉडक्ट शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरत आहे. सरकारनं याकडं विशेष लक्ष देऊन सबसिडी जाहीर करावी, अशी मागणी जैनम चरखाचे संचालक अनिल जैन यांनी केली.

 

कर्करोग मुक्त भारत करणे हा मुलभूत संकल्प करून डॉ. ए.एस चन्नीवाला यांनी अनेक वर्षाच्या अथक संशोधनातून सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी रसायन मुक्त शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी ते कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. हे खत पिकास वापरल्या नंतर शेतकऱ्यांना युरिया, डि ए.पी पाण्यात विरघळणारे एन पी के,सुक्ष्म अन्नद्रव्ये,सल्फेट खते किंवा कोणतेही रासायनिक खत वापरण्याची गरज पडत नाही.

 

आपले पिक चांगल्या किमतीत विकायचे असेल किंवा रोगमुक्त राहायचे असेल तर हे खत योग्य आहे.मी चार एकर मध्ये हे खत वापरले आहे. फरक दिसून आला आहे.लवकरच गहू तयार होवून खाण्यासाठी वापर करणार असल्याचे सुभाष कागदे
(शेतकरी ,दसूर ता. माळशिरस) यांनी सांगितले.

 

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #Scientist #lost #loved #ones #cancer #discovers #organic #fertilizer #Malshiras #Research #Alchemy, #कॅन्सर #माणसं #गमावलेल्या #शास्त्रज्ञ #शोधले #सेंद्रीयखत #माळशिरस #संशोधन #किमया
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Bhima Kesari सिंकदर शेख ठरला ‘भीमा केसरी’, मोहो॓ळमध्ये काढली मिरवणूक
Next Article पंढरीतून उद्यापासून शेतकरी संघटनेचे जनजागरण सप्ताह अभियान

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?