Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Women’s T20 सोलापूरच्या किरणने वुमेन्स टी २० मध्ये २५ बाॅलमध्ये  ५० धावा मारुन केले रेकार्ड 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळसोलापूर

Women’s T20 सोलापूरच्या किरणने वुमेन्स टी २० मध्ये २५ बाॅलमध्ये  ५० धावा मारुन केले रेकार्ड 

Surajya Digital
Last updated: 2022/05/28 at 5:20 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

श्रीपूर : पुणे येथे सुरू असलेल्या वुमेन्स टी २० चॅलेंज स्पर्धेत काल गुरुवारी (२६ मे) वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर असा सामना खेळला गेला. ट्रेलब्लेझर संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात संघाच्या बॅटर्सने शानदार कामगिरी करत १९० धावा धावफलकावर लावल्या. Kiran Navgire of Solapur sets a record by scoring 50 off 25 balls in Women’s T20 Malshiras Sreepur

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ किरणची झुंज

गोलंदाजांनी वेलोसिटी संघाला रोखण्यात यश मिळवणे. मात्र, तरीही सरस रनरेटने वेलोसिटी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी या सामन्यात माळशिरस तालुक्यातील श्रीपूरजवळील मिरे येथील किरण नवगिरे या युवा खेळाडूने सर्वांची मने जिंकली. आपला पहिलाच टी२० चॅलेंज सामना खेळणाऱ्या किरणने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले.

कधीकाळी सोलापूरच्या माळशिरस  तालुक्यातील श्रीपूरमधील चंद्रशेखर विद्यालयाच्या मैदानावर सराव करणारी किरण नवगिरे आज Womens T20 क्रिकेटमध्ये खेळत आहे, तिच्या या प्रवासामधील मेहनत, जिद्द, चिकाटी हे सर्वच प्रेरणादायी आहे.

ट्रेलब्लेझर संघाने वेलोसिटी संघासमोर विजयासाठी १९१ धावांचे आव्हान ठेवले होते.‌ मात्र, त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी १५८ धावा करणे गरजेचे होते. वेलोसिटीला यस्तिक भाटिया व शेफाली वर्मा यांनी चांगली सुरुवात दिली. मात्र, खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले, पहिलाच सामना खेळणाऱ्या किरण नवगिरेने.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/549684960042571/

 

सोलापूरच्या असलेल्या किरणने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरताना पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. तिने तुफान फटकेबाजी करत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेले. यादरम्यान अवघ्या २५ चेंडूंमध्ये तिने अर्धशतक साजरे केले. हे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. यापूर्वी हा पराक्रम शेफाली वर्माच्या नावावर होता. तिने याचवर्ष सुपरनोवा विरुद्ध ३० चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तर, जेमिमा रोड्रिग्जने २०१९ मध्ये ३१ चेंडूत ही कामगिरी केली.

माळशिरस तालुक्यातील मिरे गावच्या किरण नवगिरे वुमेन्स टी२० चॅलेंज सामन्यांमध्ये सगळ्यात जलद धावा करण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला आहे. तिने २५ बॉल मध्ये ५० धावा काढून आपल्या संघाला विजयाकडे खेचले. यापूर्वी किरणने अनेक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये विक्रम केले आहेत. तिच्या चाहत्यांची आणि तिच्या गावच्या, शाळेतील अनेक क्रिकेट रसिकांनी तिला शुभेच्छा देऊन तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल केले आहेत. किरण नावगिरेचे महिलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये विश्वविक्रम केल्यानंतर तिचे अभिनंदन केले जात आहे. तर तिला भविष्यामध्ये आणखी चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

□ किरणची झुंज

किरणने ३४ चेंडूवर ५ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. किरण बाद झाल्यानंतर संघातील कोणीही मोठी धावसंख्या उभारू‌ शकले नाही‌‌ व संघाला १७ धावांनी पराभव पत्करावा लागला.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/549246703419730/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

TAGGED: #KiranNavgire #Solapur #sets #record #byscoring #50off25balls #Women's #T20 #Malshiras #Sreepur, #सोलापूर #किरणनवगिरे #वुमेन्सटी२० #२५बाॅल   #५०धावा #रेकार्ड #श्रीपूर #माळशिरस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article children missing राजधानी दिल्लीतून चार महिन्यात 1900 मुलं बेपत्ता; सापडली किती ?
Next Article उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा काय संबंध नाही

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?