पुणे – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) राज्यातील आठ जलाशयांवरून जलविमान (सी प्लेन) सेवा सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. यासाठी खासगी संस्थेकडून सर्वेक्षण सुरू असून, पुढील तीन महिन्यांत ते पूर्ण होणार आहे. या सर्वेक्षणातून कोणत्या जलाशयावरून विमान सेवा सुरू करता येईल, हे निश्चित होईल.
हवाई वाहतूक मंत्रालयाच्या ‘उडान ५.५’ योजनेत हेलिकॉप्टर आणि सी प्लेनचा समावेश करण्यात आला आहे. देशभरात डिसेंबरअखेर १५० मार्गांवर सी प्लेन सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. ‘एमएडीसी’नेही राज्यातील आठ ठिकाणांवरून सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरण व मंत्रालयाला सादर केला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पवना धरणाचाही समावेश आहे.