Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा दुसरा दिवस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा दुसरा दिवस

Surajya Digital
Last updated: 2023/02/21 at 9:16 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार : आमदार प्रणिती शिंदेस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)¤ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे प्रश्न उपस्थित करणार

□ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार : आमदार प्रणिती शिंदे

 

सोलापूर : येत्या अधिवेशनात विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आवाज उठवणार असल्याचे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले.  पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास कदम यांनी  विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे प्रश्न उपस्थित करणार  असल्याचे सांगितले.   MLA Praniti Shinde is the second day of indefinite strike of university and college employees

 

विद्यापीठ व महाविद्यालतीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा आज मंगळवारी दुसरा दिवस होता. आमदार शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आंदोलनस्थळी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. दुसऱ्या दिवशी विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात, महासंघ उपाध्यक्ष सोमनाथ सोनकांबळे, प्रतिनिधी संतोष क्षीरसागर, सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, उपाध्यक्ष कांचन आघाव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.

 

तसेच आंदोलनस्थळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, पदमजादेवी मोहिते पाटील, सचिन गायकवाड, डॉ सुशील कुमार शिंदे, डॉ शिरीष शिंदे, माजी सदस्य डॉ. हनुमंत आवताडे, विद्यापीठ परिसर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. गौतम कांबळे, सचिव डॉ. प्रभाकर कोळेकर आदींनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

¤ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे प्रश्न उपस्थित करणार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास कदम यांनी दिले.

शहरातील सर्व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यक्ष दत्ता भोसले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी भेट दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिले. तसेच काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, उपाध्यक्ष सुनील रसाळे, सिनेट सदस्य गणेश डोंगरे आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला. हा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे मार्फत मार्गी लावू, असे त्यांनी आश्वासन दिले.

 

त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना कॉलेज कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र गोटे, विभागीय सचिव अजितकुमार संगवे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, उपाध्यक्ष आनंद व्हटकर, खजिनदार राहुल कराडे, दिपाली करजगीकर, आरती देशक, संजीवनी सादुल, नियाझ शेख, सुभाष मेंगरती आदी उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #MLA #PranitiShinde #secondday #indefinite #strike #university #college #employees, #विद्यापीठ #महाविद्यालयी #कर्मचारी #बेमुदत #संप #दुसरा #दिवस #अधिवेशन #आवाज #आमदार #प्रणितीशिंदे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सोलापूरच्या भेटीला; राजन पाटलांच्या वाड्यावर होणारा चर्चा
Next Article मंगळवेढ्यात तीन महिलांचा निर्घृण खून, संशयित माथेफिरुस अटक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?