Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बुधवारी पुण्यात येऊन आणखी एक पोलखोल करणार – किरीट सोमय्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

बुधवारी पुण्यात येऊन आणखी एक पोलखोल करणार – किरीट सोमय्या

Surajya Digital
Last updated: 2021/10/10 at 5:10 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाच्या धाडी सुरूच आहेत. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवा इशारा दिला. अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. पवार शेतकरी दादा, शेतकरी दादा म्हणत असतात. पण रोहीत पवार, सुनेत्रा पवार यांच्या नावाने कारखाने आहेत. लुटतात ते, असं ते म्हणाले.

दरम्यान अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. सोमय्या यांच्या या इशाऱ्याने एकच खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे.

अजित पवारांना माझा प्रश्न आहे की जरंडेश्वरचा मालक कोण आहे? कीती हजारांचे घोटाळे केले? या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत मी पवारांना प्रश्न विचारत राहणार. आशा करतो की त्यांच्यात या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत असावी, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला. बुधवारी मी पुण्यात जाणार आहे. यावेळी अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची आणखी एक पोलखोल करणार आहे. यांनी इतके घोटाळे केले आहेत, लूट माजवली. पवार शेतकरी दादा, शेतकरी दादा म्हणत असतात. पण रोहीत पवार, सुनेत्रा पवार यांच्या नावाने कारखाने आहेत. लुटतात ते, अशी टीकाही त्यांनी केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पवारांच्या निकटवर्तीयांवर चार दिवसांपासून रेड सुरू आहे. त्यामुळे आता हा घोटाळा पाच हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे यांना तुरुंगात जावच लागेल. कायद्याने होत असलेल्या कारवायांना सामोरे जावंच लागेल. त्यांनी लुटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल. असं मविआला स्वप्नातही वाटलं नसेल. पण मोदींनी ते करून दाखवलं, असंही ते म्हणाले.

अजित पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने 7 ऑक्टोबरला धाडी टाकल्या. अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवरही आयकर विभागाने छापेमारी केली. आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्याचं समोर आलंय.

पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #arrive #Pune #Wednesday #cast #vote #KiritSomaiya, #बुधवारी #पुण्यात #आणखी #पोलखोल #किरीटसोमय्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आर्यन खान केस – मुनमुनने सॅनिटरी पॅड्समध्ये लपवले ड्रग्स, व्हिडिओ व्हायरल
Next Article राज ठाकरे पुण्यात आंदोलन करणार, तळजाई बचाव अभियान

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?