मुंबई : माजी मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज राजीनामे दिलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय पटलावर उलथापालथ करणारा मोठा इशारा दिला. एखादं पद मिळवणं हे आपलं ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं ध्येय आहे. मला जेव्हा वाटेल इथं राम नाही आणि जेव्हा अंगावर छत कोसळेल, तेव्हा बघू, असा पंकजा मुंडे यांनी आज मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेणार का? अशा चर्चांना आता पेव फुटले आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414926629340467202?s=19
पंकजा मुंडे यांनी आज वरळीत पदाधिकाऱ्यांशी भावनिक संवाद साधला. पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी शेकडो कार्यकर्ते आज मुंबईत दाखल झाले होते. या सर्व समर्थकांचे राजीनामे पंकजा यांनी फेटाळून लावले.
पंतप्रधानाच्या निवासस्थात झालेल्या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी मंगळवारी म्हणजे आज समर्थकांची मुंबईत बैठक बोलावली होती. या घडामोडींकडे पक्षाचे नेतृत्त्व कशा दृष्टीने पाहते यावरही बरेच अवलंबून होते. यामुळे या बैठकीकडे अनेकाचे लक्ष लागून राहिले होते.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414208150413070342?s=19
यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर करत असल्याचे सांगितले. एखादं पद मिळवणं हे आपलं ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं ध्येय आहे. मला जेव्हा वाटेल इथं राम नाही आणि जेव्हा अंगावर छत कोसळेल, तेव्हा बघू, असा इशारा देतानाच आता आपलं घर सोडायचं नाही. हा माझा निर्णय आहे तो तुम्ही मान्य कराल ही अपेक्षा आहे, असं भाजप नेत्या पंकजा यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामेही फेटाळून लावले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
https://twitter.com/Pankajamunde/status/1414921883028393987?s=19
वंचितांच्या बाजूनं प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी मी राजकारण करते आली आहे. मला माझ्यासाठी, प्रीतमसाठी, अमितसाठी किंवा यशस्वीसाठी काही नको. जे काही हवं ते समाजासाठी हवं आहे. वंचितांचं, तळागाळातील लोकांचं राजकारण करताना मला आई व वडील या दोन्ही भूमिकांमधून निर्णय घ्यावा लागतो. अविचारानं निर्णय घेऊन कसं चालेल?,’ असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला. यावेळी कार्यकर्ते मन लावून ऐकत होते.
त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर केले. तुमच्या राजीनाम्यावर मला स्वार व्हायचे आहे. मला दबावतंत्रही करायचं नाही. माझा तो स्वभाव नाही. माझ्यावर ते संस्कारही झाले नाहीत. गोपीनाथ मुंडे यांनी उसाच्या फडातून आणून माणसं जोडली. कुणाला सभापती बनवलं तर कुणाला मार्केट समितीचा चेअरमन केलं. हे असंच जाऊ द्यायचं का सगळं?, असा सवाल करतानाच इथून पुढे असा प्रयोग करू नका. तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. पद मिळवणं हे मुख्य ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं ध्येय आहे. मला जेव्हा वाटेल इथं राम नाही. तेव्हा बघू. पण आता आपण आपलं घर सोडायचं नाही. हा माझा निर्णय तुम्ही मान्य कराल ही अपेक्षा आहे, असं पंकजा यांनी आवर्जून म्हणाल्या. यावेळी पदाधिकारीही गंभीर झाले होते. पक्षातील विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी कौरव – पांडवाचे उदाहरण देऊन निशाणा साधला. धर्मयुद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414511571418554369?s=19
मला कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही. मला दबाव तंत्र करायचं असेल तर ही ती जागा नाही. ही जागा पुरणार नाही. त्यासाठी वेगळी जागा लागेल, अशा शब्दांत पंकजा मुंडे वरळीत कडाडल्या. भागवत कराड यांच्या मंत्रिपदाबाबत पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. मी माझ्या समाजाच्या मंत्र्यांला अपमानित का करु? लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात आहे, असं त्या म्हणाल्या. निवडणुकीत अनेक लोक पराभूत झाले. कराड यांचं वय ६५ आहे. ते आपल्या समाजाचे आहेत मी त्यांचा अपमान करणार नाही, असं पंकजा मुंडे ह्या आवर्जून म्हणाल्या.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414799478171656193?s=19
* यांचा डाव पूर्ण होऊ द्यायचा नाही
आपली शक्ती कमी करण्याचा यांचा डाव पूर्ण होऊ द्यायचा नाही. मला पुढे खडतर मार्ग दिसतो. पण आपण संघर्ष करत राहू, योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत. सात्विक आहोत, असं पंकज मुंडे म्हणाल्या.
मी गोपीनाथ मुंडेंची वारस आहे. मला अमूक पद हवं, तमूक पद हवं असं मी कधीच म्हटलं नाही. मी कधी तशी मागणीही केली नाही. महाराष्ट्र राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसवणं हे गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न होतं. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच माझा संघर्ष सुरू होता. त्यासाठीच त्यांच्या निधनानंतर मी संघर्ष यात्रा काढली होती, असं पंकजा मुंडे यांनी आवर्जून सांगितले.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414872419374796801?s=19