Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महापालिका परिवहन उपक्रमाकडील त्या वॉल्वो बसेस विका किंवा चालवा !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

महापालिका परिवहन उपक्रमाकडील त्या वॉल्वो बसेस विका किंवा चालवा !

Surajya Digital
Last updated: 2022/10/12 at 3:44 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ महापालिका आयुक्तांचे आदेश !

सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील त्या दहा वॉल्वो बसेस विका किंवा दुरुस्त करून चालवा असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. Solapur Ordinance Commissioner sell or drive those Volvo buses from the Municipal Transport Undertaking

Contents
□ महापालिका आयुक्तांचे आदेश !स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□  परिवहनला दरमहा ९२ लाखांचा तोटा

केंद्र शासनाच्या जे. एन. एन. यु. आर. एम. या योजनेअंतर्गत काही वर्षांपूर्वी सोलापूर महापालिकेला बसेस मिळाल्या होत्या मात्र काही बसेस चेसी क्रॅक व इतर कारणास्तव वादग्रस्त ठरल्या. त्यामुळेच या बसेस बंद अवस्थेत पडून आहेत. या बसेस धुळखात पडून आहेत. त्या बंद अवस्थेत ठेवल्याने मोठे नुकसान होत आहे.

यामध्ये 10 वॉल्वो बसेसचाही समावेश आहे. या दहा वॉल्वो बसेस विकून टाका किंवा महापालिका परिवहन उपक्रमासाठी दुरुस्त करून चालवा, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्तांनी महापालिका परिवहन उपक्रमाचे उपव्यवस्थापक तथा सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांना दिले आहेत.

या 10 वॉल्वो बसेसची नेमकी स्थिती कशी आहे ?  त्याची तपासणी करावी. दुरुस्ती करून विकाव्यात किंवा शाळा, महाविद्यालय अथवा एखाद्या कंपनीला संपर्क करून चालविण्यास द्याव्यात.  महापालिका परिवहन उपक्रमाकडे शक्य झाल्यास वापराव्यात, अशाही सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या आहेत.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□  परिवहनला दरमहा ९२ लाखांचा तोटा

 

महापालिकेच्या परिवहन विभागाचा दरमहा खर्च १ कोटी १७ लाख रुपये तर उत्पन्न केवळ २५ लाख रुपये आहे. यामुळे परिवहन विभागास एका महिन्याला ९२ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. हा तोटा कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली.

 

परिवहन विभागाचा खर्च कसा कमी करता येईल, याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी खर्च १ कोटी १७ लाख तर उत्पन्न २५ लाख असल्याचे सांगण्यात आले. खर्चात वेतनासाठी ३४ लाख रुपये, डिझेलवर २० लाख, पेन्शनसाठी ५८ लाख तर किरकोळ खर्च ५ लाख रुपये आहे. उत्पन्न आणि खर्च यात अधिक तफावत असल्यामुळे परिवहन उपक्रम चालवणे महापालिकेला अवघड झाले आहे.

परिणामी या उपक्रमावर होणार खर्च कमी कसा करता येईल, याचा विचार सुरू असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. यावेळी परिवहन उपव्यवस्थापक श्रीराम पवार, मुख्य लेखापाल रूपाली कोळी आदी उपस्थित होते.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #Ordinance #Commissioner #sellordrive #Volvobuses #Municipal #Transport #Undertaking, #सोलापूर #महापालिका #परिवहन #उपक्रम #दीर्घकाळ #गैरहजर #कर्मचारी #बडतर्फी #कारवाई !
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । सीसीएच ॲपच्या माध्यमातून लाखोंची फसवणूक
Next Article दिलीप मानेंना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण; शिवसेना प्रवेशाचा निर्णय चुकल्याची कबुली राजकीय सोलापूर

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?