Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2023/08/09 at 12:53 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

मुंबई  : ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. हृदयविकाराच्या झटक्याने हरी नरके यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. Senior thinker Hari Narke passes away with emotional tributes Colleague Chhagan Bhujbal Condolences

 

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे आज निधन झाले आहे. तळेगाव दाबाडे इथला 1 जानेवारी 1963 चा त्यांचा जन्म आहे. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. तसेच त्यांनी पुणे विद्यापीठात अध्ययनाचेही काम केले असून भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष पदाचा कारभारही पाहिला आहे. त्यांनी ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा’ अशी पुस्तके लिहिली आहेत.

एक जून 1963 रोजी जन्मलेले हरि नरके हे गेल्या वर्षभरापासून आजारी होते त्यांच्यावर गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू होते आज मुंबईला त्यांना उपचारासाठी आणत असताना सकाळी सहा वाजताच दोन उलट्या झाल्यानंतर त्यांना एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास – संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे, असे म्हणत शिंदेंनी नरकेंना श्रद्धांजली अर्पण केली.

मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले, – असे म्हणत शरद पवार यांनी नरके यांना श्रद्धांजली वाहिली. नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या -लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत, असेही ते म्हणाले.

हरी नरके यांच्या निधनावर कृषीमंत्री धनंजय मुंडे, जयंत पाटील, शरद पवार यांसह अनेकांनी दुःख व्यक्त केले. ज्येष्ठ विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके सरांच्या अकाली निधनाचे वृत्त दुःखद आहे. सामाजिक समतेच्या चळवळीतील त्यांचे योगदान कायम दिशादर्शक ठरले आहे, असे ते म्हणाले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

हरी नरके यांच्या निधनावर त्यांचे सहकारी आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी शोक व्यक्त केला आहे. नरकेंच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी आहे. मी विचार करू शकत नाही की नरके आज आमच्यामध्ये नाहीत. फुले शाहु आंबेडकरवादी जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले यांचे मुळ चित्र शोधून काढण्याचे काम त्यांनी केल्याचे भुजबळांनी सांगितले.

त्यांचे हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेत 37 ग्रंथ प्रकाशित आहेत. तर त्यांचे वृत्तपत्रे, नियतकालिकांमधून 100 पेक्षा जास्त लेख प्रकाशित झालेले. तसेच महात्मा फुलेंच्या साहित्याचा हिंदी आणि इंग्रजी अनुवादांच्या खंडांचे त्यांनी संपादक म्हणून काम पाहिले. त्यांना महात्मा फुले समता पुरस्कार, यशवंतराव होळकर पुरस्कार आणि गोविंद पानसरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते.

 

डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन असेही त्यांनी पुस्तक लिहिले. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी नरके आयुष्यभर कार्यरत राहिले.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #Senior #thinker #HariNarke #passesaway #emotional #tributes #Colleague #ChhaganBhujbal #Condolences, #ज्येष्ठ #विचारवंत #हरीनरके #निधन #शोक #भावपूर्ण #श्रद्धांजली #मुख्यमंत्री #सहकारी #छगनभुजबळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर
Next Article शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

Latest News

‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी
Top News July 1, 2025
रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी
देश - विदेश July 1, 2025
राजदंड उचलण्याचा प्रयत्न, नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित
Top News July 1, 2025
ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन
देश - विदेश July 1, 2025
पहलगाम हल्ला हा एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते-  जयशंकर
Top News July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?