Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळून सात ठार, गेल्याच आठवड्यातील दुर्घटनेत पाच मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळून सात ठार, गेल्याच आठवड्यातील दुर्घटनेत पाच मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/05/29 at 10:11 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

उल्हासनगर : उल्हासनगर नेहरु चौक परिसरातील साई शक्ती  या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर ठाणे इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना काल शुक्रवारी (ता.28) रात्री 9 च्या सुमारास घडली.

नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोर साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 7 व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही व्यक्ती अडकल्याअसून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृतांमधील चार जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.

एनडीआरएफ, टीडीआरएफ टीम तसेच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह तातडीने घटना स्थळी दाखल होत युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर सुखरूप बाहेर काढण्याचे आदेश यावेळी दिले. pic.twitter.com/slCXJLuZh8

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 28, 2021

पुनीत बजोमल चांदवाणी (वय 17 वर्ष), दिनेश बजोमल चांदवाणी (वय 40 वर्ष), दीपक बजोमल चांदवाणी (वय 42 वर्ष), मोहिनी बजोमल चांदवाणी (वय 65 वर्ष), कृष्णा इनूचंद बजाज (वय 24 वर्ष), अमृता इनूचंद बजाज (वय 54 वर्ष), लवली बजाज (वय 20 वर्ष) असे सात मृतांची नावे आहेत. अलगोत नायडर ( पु/ वय 60 वर्ष) हा गंभीर जखमी आहे.

13 कोटी खर्चून बांधलेला पूल पहिल्याच पावसात मोडून पडला, पुलाचा पाया कमजोर, 'यास' वादळाचा सामना करण्यात अपयशीhttps://t.co/qPFK2GedQm

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली. तसंच अशा धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेल्या इमारतीच्या बिल्डरविरोधात कारवाई करण्याचा सूचना पालिका आयुक्तांना दिल्या आहे. परंतु या घटनामुळे उल्हासनगरमधील धोकादायक, अतिधोकादयक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दारु अड्ड्यावर धाड टाकण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, वेळापुरातील पारधी वस्तीतील घटना
https://t.co/5MCyT44Uow

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या इमारतीमध्ये एकूण 29 फ्लॅट होते. स्लॅब कोसळल्यानंतर जोरदार आवाज झाला, त्यामुळे काही रहिवाशांनी बाहेर पळ काढला तर काहींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ मदतीसाठी ठाणे महानगरपालिकेची TDRF टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. या पथकांनी ढिगारा बाजूला करुन सात मृतदेह बाहेर काढले.

नेहरू चौक, उल्हासनगर येथील साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा पाचव्या मजल्या पासून पहिल्या मजल्या पर्यंतचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचत सुरु असलेल्या मदत आणि बचाव कार्याची पाहणी केली. pic.twitter.com/d9cuvvcszA

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 28, 2021

* गेल्याच आठवड्यातील दुर्घटनेत पाच मृत्यू

गेल्याच आठवड्यात मोहिनी पॅलेस इमारतीमध्ये देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. त्यात देखील पाच जणांचा मृत्यू झाला होता. 1994 -95 मध्ये बांधलेल्या काही धोकादायक इमारतीमधील स्लॅब पालिकेने कारवाई करत तोडले होते. मात्र संबंधित बिल्डरने हेच स्लॅब वेल्डिंग करत परत जोडले त्यामुळे या दुर्घटना होत आहेत. त्यामुळे अशा इमारती शोधून त्या रिकाम्या कराव्यात तसेच अशा इमारती बांधणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

सॅनिटायझर पिऊन विवाहितेची आत्महत्या, सत्य लपवण्यासाठी नवऱ्याचं भयंकर कृत्य, शवविच्छेदन टाळण्यासाठी कोरोना पॉझिटिव्हचा खोटा अहवाल सादर
https://t.co/29MJT2j7D5

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Sevenkilled #Slab #collapse #ulhasnagar #fivekilled, #उल्हासनगर #स्लॅब #कोसळून #सातठार #गेल्याच #आठवड्यातील #दुर्घटनेत #पाचमृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दारु अड्ड्यावर धाड टाकण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला
Next Article डब्ल्यूटीसी फायनल- आयसीसीची मोठी घोषणा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?