Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष; शरद पवारांनी उद्या बोलावली बैठक, आमदारांना हॉटेलमध्ये हलवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष; शरद पवारांनी उद्या बोलावली बैठक, आमदारांना हॉटेलमध्ये हलवले

Surajya Digital
Last updated: 2023/07/05 at 8:13 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

● अजित पवारांनी आमदारांना हॉटेलमध्ये हलवले

 

मुंबई : अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मांडणारे 40 आमदारांचे एक पत्र निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तशा आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी मंजूर केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. Ajit Pawar NCP President; Sharad Pawar called a meeting tomorrow, MLAs were moved to a hotel ज्या दिवशी शपथविधी झाला त्याच्या दोन दिवस आधीच अजित पवारांनी पक्षाच्या 40 आमदारांचे पत्र निवडणूक आयोगात दाखल केल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच मुंबईनंतर आता शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 6 जुलैला नवी दिल्लीत बैठक बोलावली आहे. आजच राज्यातील राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांनी मुंबईत बैठक घेतली. त्या मेळाव्यात शरद पवार यांनी भाजपसह बंडखोरांवर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादीच्या बंडखोरीवरुन शरद पवारांनी भाजपवर निशाना साधला आहे. राष्ट्रवादीवर बिनबुडाचे आरोप करुन पक्षाला बदनाम करण्याचे काम मोदी करत असल्याचा आरोप पवारांनी केला. राष्ट्रवादी पक्ष भ्रष्ट आहे असे वाटत असेल तर राष्ट्रवादी पक्षाला सत्तेत का घेतले, असा सवाल त्यांनी केला. शिवाय उशःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असे त्यांनी शेवटी भाषणात म्हटले.

मुंबईतल्या वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये अजित पवार यांच्या गटाची बैठक झाली. दुपारी एक वाजेपर्यंत 30 आमदार येथे पोहोचले होते. तसेच अनेक कार्यकर्ते या ठिकाणी हजर झाले. त्यातच आता आम्ही खरी राष्ट्रवादी असल्याचे दाखवण्यासाठी अजित पवार गटाकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले. प्रतिज्ञापत्रावर अजित पवारांच्या समर्थकांकडून सह्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडे हे पत्र दिले आहे.

अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झालेले आमदार परत शरद पवारांकडे परतू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. अजित पवारांची नुकतीच मुंबईत सभा झाली. त्यानंतर अजित पवारांनी आमदारांना वांद्रे येथील ताज लँड एन्ड या हॉटेलमध्ये ठेवले आहे. या आमदारांच्या सोबत स्वतः अजित पवार देखील उपस्थित आहेत. दरम्यान, अजित पवारांसोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात असल्याचे जयंत पाटलांनी म्हटले आहे. आजच्या बैठकीत अजित पवारांनी मोठे विधान केले. मला चार वेळा उपमुख्यमंत्री केले आता पाचव्यांदा उपमुख्यमंत्री केले. मला पण मोठ्या पदाची अपेक्षा आहे, असे अजित पवार म्हणाले. माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत. त्या राबवायच्या म्हटले तर प्रमुखपद लागते, असे अजित पवार म्हणाले.

कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांचा नामोल्लेख न करता रिटायर्ड होत नसल्याची खंत व्यक्त केली. खालचा ट्वीट व्हिडिओ पहा…

 

#WATCH | Maharashtra Deputy CM Ajit Pawar says, "You portrayed me as a villain in front of everyone. I still have deep respect for him (Sharad Pawar)…But you tell me, IAS officers retire at 60…even in politics
– BJP leaders retire at 75. You can see the example of LK Advani… pic.twitter.com/T2XqCzEH89

— ANI (@ANI) July 5, 2023

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता राजकारणात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही पवारांची लढाई आता केंद्रीय निवडणूक आयोगात देखील पाहायला मिळणार आहे. अजित पवार गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवारांच्या राजकीय भूमिकेमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी कोणाची, हे दाखविण्यासाठी शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची लढाई केंद्रीय निवडणूक आयोगात देखील पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी केंद्रीय निवडणूक आयोगात अर्ज दाखल केले आहेत.

मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आज शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली. या ठिकाणी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 10 आमदार पोहोचल्याची माहिती आहे. दुपारी एक वाजता या ठिकाणी बैठक असून जास्तीत जास्त आमदार येथे येतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. तर अजित पवार यांच्या गटाची वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक आहे. या ठिकाणीही आमदार पोहोचत आहेत.

अजित पवार यांच्या बैठकीला साडेबारा वाजेपर्यंत 24 आमदार पोहोचले आहेत. त्यांची मुंबईतल्या वांद्रे येथील एमईटी येथे अजित पवार यांच्या गटाची बैठक होत आहे. थोड्याच वेळापूर्वी अजित पवार या ठिकाणी पोहोचले असून ते फोनवरून बोलताना दिसत आहेत. तर शपथ घेतलेल्या 8 आमदारांसह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही या ठिकाणी दिसून येत आहेत. स्टेजवरील खुर्च्याही वाढवण्यात आल्या आहेत.

You Might Also Like

संजय गायकवाडांना समज देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, मराठी माणसाच्या भल्यासाठी राज आणि मी एकत्र आलोय – उद्धव ठाकरे

आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, मारहाणीचा पश्चात्ताप नाही – आ. संजय गायकवाड

स्व. रामभाऊ म्हाळगी यांचं कार्य आजही मार्गदर्शक – रविंद्र चव्हाण

फिनले मिलचा प्रश्न दिल्ली दरबारी…. आ. प्रवीण तायडेसह शिष्टमंडळाने मांडल्या कामगारांच्या व्यथा

TAGGED: #AjitPawar #NCP #President #SharadPawar #called #meeting #tomorrow #MLAs #moved #hotel, #अजितपवार #राष्ट्रवादी #अध्यक्ष #शरदपवार #उद्या #बोलावली #बैठक #आमदार #हॉटेल #हलवले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रवादी पक्षावर दावा : अजित पवार गटाकडून प्रतिज्ञापत्र भरण्यास सुरुवात
Next Article अनर्थ टळला : नूतन जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; भाजपाच्या मंत्र्यांची मध्यस्थी

Latest News

वडोदरा पूल दुर्घटना – पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबियांसह जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर
Top News July 9, 2025
संजय गायकवाडांना समज देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजकारण July 9, 2025
इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक गोल्डमन सॅक्समध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून सामील होणार
देश - विदेश July 9, 2025
महाराष्ट्रासारखंच बिहारमध्ये मतांच्या चोरीचा प्रयत्न सुरू – राहुल गांधी
Top News July 9, 2025
मला सरकार चालवल्याबद्दल नोबेल मिळाला पाहिजे- अरविंद केजरीवाल
Top News July 9, 2025
राजस्थानात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले, दोन मृतदेह सापडले
देश - विदेश July 9, 2025
केजरीवालांच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाची ईडीला नोटीस
Top News देश - विदेश July 9, 2025
मुंबई, मराठी माणसाच्या भल्यासाठी राज आणि मी एकत्र आलोय – उद्धव ठाकरे
राजकारण July 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?