Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अडचणीतल्या कारखान्याला गतवैभव मिळवून देणार; सरकोलीत सांत्वनपर शरद पवारांची भेट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अडचणीतल्या कारखान्याला गतवैभव मिळवून देणार; सरकोलीत सांत्वनपर शरद पवारांची भेट

Surajya Digital
Last updated: 2020/12/18 at 12:55 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर : पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदार भारतनाना भालके चिकाटीने पाठपुरावा करीत होते. आजारी असतानाही नानांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. कालच कारखान्याचे व्हाईस चेअरमन व काहीजण मला भेटले व वस्तुस्थिती सांगितली. काळजी करण्यासारखे कारखान्याचे चिञ आहे, माञ थोड्या दिवसात मी परत येणार आहे. सर्वांना सोबत घेवुन कारखान्याला गतवैभव आणू, असे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी दिले.

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे सरकोली (ता. पंढरपूर) येथील भगीरथ भालके व कुटुबियांची आज सकाळी त्यांनी भेट घेत सांत्वन केले. यानंतर शोकसभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंञी दत्ताञय भरणे, आ. संजय शिंदे, आ. यशवंत माने, बळीरामकाका साठे, उमेश पाटील, कल्याणराव काळे, दिपक साळुंखे, युवराज पाटील, व्यंकटराव भालके, मोहन कोळेकर, संदिप मांडवे, संतोष सुळे, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, संगिता नागणे, मनोहर सपाटे, मारुती जाधव, आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व भारतनाना भालकेंवर प्रेम करणारी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

शरद पवार म्हणाले की, नानांचे मतदारसंघातील जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध होते. मतदारसंघातील कामासाठी अखंड धडपड करीत होते. नाना आजारी असताना मी दररोज माहिती घेत होतो. मुंबई – दिल्ली येथील तज्ञ आरोग्य तज्ञांकडे घेवुन जाण्याचा विचार केला. त्यांनी नानांच्या आजारांचा अहवाल मागितला. माञ पुणे येथील डाॅक्टरांनी नानांला हलवणे योग्य नसल्याचा अहवाल दिला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नानांनी‌ मंगळवेढा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी हट्ट, चिकाटी ठेवली होती. यामुळे त्यांनी आजाराकडे दुर्लक्ष केले. नानांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यात येईल, असेही पवार यावेळी म्हणाले. नाना प्रत्येक वेळी वेगळ्या पक्षातून लढले तरी निवडून आल्यानंतर माझ्याकडे यायचे अन मी आहेच असे हक्काने सांगायचे.

आगामी निवडणुकीत वेगळं काही होणार नाही, त्याची चर्चा करु नका, असेही सांगत अप्रत्यक्षपणे भगीरथ भालके हेच आमदार होतील असे संकेत खा. शरद पवार यांनी दिले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #अडचणीतल्या #कारखान्याला #गतवैभव #मिळवून #देणार #सरकोलीत #सांत्वनपर #शरदपवारांची #भेट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपा केंद्रीय मंत्र्यांच्या जावईची पोलिस कोठडीत रवानगी
Next Article शेतकऱ्यांना समर्थन देत मुख्यमंत्री केजरीवालांनी विधानसभेत कृषी कायद्याच्या प्रति टराटरा फाडल्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?