Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवारांची चाचणी निगेटिव्ह; निवासस्थानावरील दोघे, तीन सुरक्षारक्षक निघाले कोरोना पॉझिटिव्ह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

शरद पवारांची चाचणी निगेटिव्ह; निवासस्थानावरील दोघे, तीन सुरक्षारक्षक निघाले कोरोना पॉझिटिव्ह

Surajya Digital
Last updated: 2020/08/17 at 11:58 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी कोरोनाने शिरकाव केला आहे. ‘सिल्व्हर ओक’ येथील पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकीचा समावेश आहे. यानंतर शरद पवार यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शरद पवार यांना राज्यात फिरु नका, अशी विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सिल्व्हर ओकमधील दोन लोक आणि सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्यांपैकी तीन लोक पॉझिटिव्ह सापडले आहेत.  संसर्ग झालेले सुरक्षारक्षक बऱ्याचदा लोकांना शरद पवारांपासून दूर करण्याचं काम करत असतात. त्यातून त्यांना लागण झाली असल्याची शक्यता आहे”.

“दरम्यान शरद पवार यांची रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात चाचणी करण्यात आली. त्यांना काहीही समस्या नाही. ते अत्यंत सुरक्षित आहेत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आपण त्यांना राज्यात फिरु नका अशी विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

“सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकी यांच्या घरातील तसंच ज्या चाळीत राहतात तेथील लोकांची चाचणी केली जाणार आहे. त्यांची पूर्ण काळजी घेतली जात आहे. प्रोटोकॉलप्रमाणे सर्व गोष्टी केल्या जात आहेत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.  पवार साहेबांच्या निवासस्थानातील बाधित कर्मचारी ज्या ठिकाणी राहतात, तेथील चाळीतील रहिवाशांचं अँटिजेन व अन्य तपासण्या करण्यात येत आहेत. त्या कर्मचाऱ्यांची काळजीही नियमानुसार घेतली जात आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.

शरद पवार हे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आम्ही त्यांना नेहमीच काळजी घेण्याबद्दल सांगत असतो. पण त्यांचा उत्साह मोठा आहे. लोकांच्या प्रती त्यांची बांधिलकी आहे. त्यातून ते लोकांमध्ये जात असतात. कदाचित फिरण्यातून त्यांना काही संदेश द्यायचे असतात. त्या सर्व अनुभवांतून जाण्याचा ते आवर्जून प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते स्वतःही काळजी घेत असून चिंता करण्याचे कारण नाही,’ असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

You Might Also Like

राहुल गांधींच्या विरोधात धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या दराडेंविरोधात गुन्हा दाखल

तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश यांचं निधन

महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती

भारताला बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज – स्वामी गोविंददेव गिरी

घरात पाणी गेलेल्या नागरीकांना दहा हजार रुपयांची मदत – उपमुख्यमंत्री पवार

TAGGED: #शरदपवार #कोरोनाचाचणीशा #सिल्हरओक #सुरक्षारक्षक #पॉझिटिव्ह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीत आग; अग्निशमनच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल, नियंत्रण मिळवण्यात यश
Next Article सर्वत्र होत असलेल्या आरोपाचे फेसबुकने केले खंडन; केला मोठा खुलासा

Latest News

राहुल गांधींच्या विरोधात धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या दराडेंविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र May 29, 2025
तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश यांचं निधन
देश - विदेश May 29, 2025
महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती
महाराष्ट्र May 29, 2025
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीत वाढ
Top News May 29, 2025
सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद
सोलापूर May 29, 2025
सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न
सोलापूर May 29, 2025
भारताला बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज – स्वामी गोविंददेव गिरी
महाराष्ट्र May 29, 2025
घरात पाणी गेलेल्या नागरीकांना दहा हजार रुपयांची मदत – उपमुख्यमंत्री पवार
महाराष्ट्र May 29, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?