मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांना पित्ताशयाचा त्रास जाणवल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज शनिवारी डॉक्टरांच्या एका टीमने पवारांचं चेकअप केलं. प्रकृतीत सुधारणा दिसल्यानंतर त्यांना डीस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती नवाब मलिकांनी दिलीय. पवारांना 7 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर त्यांची तब्येत स्थिर राहिली तर त्यांची पित्ताशयाची सर्जरी केली जाणार आहे.

ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी शरद पवार हे रुग्णालयातून घरी परतले. त्यांची प्रकृती ठणठणीत असून ते स्वतः गाडीतून उतरुन घरात गेले. त्यांना पोटात दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये पित्ताशयाचा त्रास असल्याचे समोर आले होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, येत्या काही दिवसांत त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रकृतीत सुधारणा झाल्याने शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानी आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. शरद पवार यांच्या पित्तनलिकेच्या मुखाशी असलेला खडा काढण्यात आला होता. शस्त्रक्रियेनंतर दोन ते तीन दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, शरद पवार यांच्यावर येत्या 8 ते 10 दिवसांत आणखी एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.
https://twitter.com/ANI/status/1378234726410973189?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1378234726410973189%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, डॉक्टरांनी शरद पवार यांची तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर राहिल्यास त्यांच्या गाल ब्लॅडरची शस्त्रक्रिया केली जाईल.
