Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर एकत्र,  हसतमुखाने हस्तांदोलन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर एकत्र,  हसतमुखाने हस्तांदोलन

Surajya Digital
Last updated: 2023/08/01 at 2:34 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
● नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदानस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

● नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक स्मारक समितीच्या वतीने लोकमान्य टिळक पुरस्कार आज पुण्यात देण्यात आला. यावेळी त्यांनी एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी त्यांना टिळक ज्याप्रमाणे उपरणे वापरत होते तसे उपरणे आणि टोपी प्रदान करण्यात आली. यावेळी मंचावर शरद पवारांसह अनेक नेते उपस्थित होते. Sharad Pawar and Prime Minister Narendra Modi together on stage, smilingly shaking hands Pune Tilak Award

पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झाले आहेत. आज मोदी यांना येथे टिळक स्मारक समितीच्या वतीने जाहीर झालेला लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे उपस्थित आहेत. मंचावर पोहोचल्यावर मोदी यांनी शरद पवारांची भेट घेतली व त्यांनी हसत हसत हस्तांदोलन केले. यावेळी मोदींनी टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने महाराष्ट्रात खूप खूप स्वागत आहे. समाजाच्या मनातील ओळखणारे नेते नरेंद्र मोदी आहेत. मोदी हे जागतिक नेते आहेत. या लोकमान्य टिळक पुरस्काराच्या या ऐतिहासिक सोहळ्याला आम्हाला उपस्थित राहता आले, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले.

 

रयतेचे राज्य प्रस्थापित करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी या पुण्यातून केले आहे, असे शरद पवारांनी यावेळी म्हटले. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश राजवटीला आव्हान देण्यासाठी पुण्यातून पत्रकारितेला सुरुवात केली. वृत्तपत्राच्या माध्यमातून इंग्रजांवर प्रहार केला. त्यांना दबावाखालील पत्रकारिता मान्य नव्हती, असे पवारांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते टिळक पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

 

Speaking at the Lokmanya Tilak National Award Ceremony in Pune. https://t.co/DOk5yilFkg

— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2023

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

“Will donate prize money to Namami Gange project”: PM Modi after receiving Lokmanya Tilak National Award

Read @ANI Story | https://t.co/OQYSYNSSPT#PMModi #LokmanyaTilakAward #Pune pic.twitter.com/IZlffnHU1t

— ANI Digital (@ani_digital) August 1, 2023

 

आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मी येथे येण्यासाठी जेवढा उत्साहित तेवढाच भावूक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यात म्हटले. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना मोदी यांनी भाषणाला मराठीतून सुरुवात केली. माझ्या जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे. हा पुरस्कार मिळणे हे माझ्यासाठी मोठ्या भाग्याची गोष्ट आहे, असे यावेळी ते म्हणाले.

 

 

 

》 पुणेकरांनी केले मोदींचे स्वागत; मोदींच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांना आज टिळक स्मारक समितीच्या वतीने लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला. अग्रीकल्चर कॉलेजच्या मैदानावरील हेलिपॅडवर मोदींचे हेलिकॉप्टरद्वारे आगमन झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते मोटारीने श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचं दर्शन घेतले.

यावेळी भाजपा समर्थकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. अनेक कार्यकर्ते हे मोदींच्या स्वागतासाठी सकाळी 6 वाजतापासून त्यांच्या आगमनाची वाट पाहत होते. मोंदी यांचे पुण्यात खूप स्वागत आहे, अशी भावना ही त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली. यावेळी पुणेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानले.

पीएम नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दगडूशेठ गणपती मंदिराचं दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हातून छोटेखानी गणेशाची पूजा-अर्चना करण्यात आली. यावेळी त्यांनी गणपतीची आरतीही केली. आता एसपी कॉलेजमधील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. शहरातील शिवाजी रस्ता, एफसी रोड, जंगली महाराज रोड, शास्त्री रोड आणि टिळक रोड बंद करण्यात आले आहे.

 

○ भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…..

 

* महाराष्ट्राच्या भूमीला कोटी कोटी नमन

* देशात काशी आणि पुण्याचे विशेष स्थान

* पुणे शिक्षण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले

* टिळकांनी स्वातंत्र्य आंदोलनाची दिशा बदलली

* पुरस्काराची राशी नमामी गंगे या योजनेला समर्पित

* हा पुरस्कार देशातील जनतेला समर्पित

* पुणे ही फुले, टिळक, चाफेकर यांच्यासारख्या वीरांची भूमी.

* टिळक हे आधुनिक भारताचे निर्माते होते.

* टिळकांनी देशासाठी त्याग आणि बलिदान दिले.

* टिळक यांच्या नावाने दिलेल्या या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे.

* टिळक गुजरातच्या अहमदाबादमध्ये आले होते. यावेळी 40 हजारांच्या संख्येने टिळकांच्या स्वागतासाठी गुजराती युवक आले होते. यात वल्लभभाई पटेलही होते. त्यानंतर पटेलांनी अहमदाबादेत टिळकांची मूर्ती स्थापन केली.

* टिळकांचा भारताच्या सामर्थ्यावर विश्वास होता, त्यानंतर

देशातील प्रत्येक जण एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकले.

* रस्त्याचे नाव बदलले तरी विरोधक गोंधळ घालतात.

* टिळकांनी कित्येक युवकांना तयार केले.

* सावरकरांच्या बॅरिस्टरसाठी टिळक यांनी शिफारस केली.

* टिळकांच्या स्वदेशच्या नाऱ्यातून आज आपला देश आत्मनिर्भर भारत बनत आहे.

* त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करत आहोत.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #SharadPawar #PrimeMinister #NarendraModi #together #stage #smilingly #shakinghands #Pune #Tilak #Award, #शरदपवार #पंतप्रधान #नरेंद्रमोदी #भेट #ट्वीटद्वारे #माहिती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्वान घुटमळत घुटमळत नाल्याजवळ गेले, पांडुरंग ज्वेलर्समधील दागिन्यांच्या रिकाम्या बॉक्सचा सुगावा लागला
Next Article ठाण्यातील दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू; स्थानिक कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?