नांदेड, २९ ऑगस्ट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली असल्याचे काँग्रेस पक्षाचे नांदेडचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. आज दुपारी शरद पवार यांच्याशी चव्हाण यांचा संवाद झाला.
सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण, जिल्हा अध्यक्ष राजेश पावडे व पदाधिकारी नांदेड करांच्या मदतीला पोहोचत आहेत. नांदेड जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात सतत चालू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात जनजीवन विस्कळित झाले आहे. नांदेड शहरी भागात अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.
त्यामुळे जास्त प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. नांदेड तालुक्यातील काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि आढावा घेऊन तेथील स्थानिक नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी नागरिकांची मदत करत आहेत.