Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवार माझा बापच आहे, आज त्यांची आठवण येत आहे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शरद पवार माझा बापच आहे, आज त्यांची आठवण येत आहे

Surajya Digital
Last updated: 2021/02/27 at 1:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नाशिक : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आज त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावर एसीबीने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल केला. पण चित्रा वाघ यांनी आरोप फेटाळलेत. तसेच ‘आज मला पवार साहेबांची आठवण येत आहे. तो बापच आहे माझा. त्यांना मी पहिल्यांदा दाखल झालेल्या एफआयआरची कॉपी दाखवली होती’, असेही त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या चालवत आहेत. त्यावर चित्रा वाघ यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी यावेळी उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहेत त्यांनी कारवाई करावी असं त्या म्हणाल्या आहेत. उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री नसते तर त्यांनी संजय राठोडला फाडून खाल्ल असतं, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. त्यांच्या पतीवर झालेले लाच घेतल्याचे आरोप आणि त्या प्रकरणी आता दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ म्हणाल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“एफआयआरची कॉपी माझ्या घरी पाठवायला तुमच्याकडची माणसं संपली आहेत का. माझ्या नवऱ्याने एक रुपया पण नाही घेतला. तो त्या ठिकाणी नव्हता. आता जनतेला कळू द्या की खरं काय आहे ते,” असं आव्हान चित्रा वाघ यांनी दिलं आहे.

“आज मला पवार साहेबांची फार आठवण येत आहे. 2017 मध्ये जेव्हा पहिली एफआयआर दाखल झाली तेव्हा शरद पवारांनी मला बोलावून घेतलं. तो बापच आहे माझा. त्यांना मी एफआयआरची कॉपी दाखवली. ते म्हणाले चित्रा यात तुझ्या नवऱ्याचं नावच नाहीये.”

“त्या केसमध्ये त्यांना चित्रा वाघ यांना अडकवायचं होतं. त्यांनी मुंबई बँकेला पत्र पाठवलं. चित्रा वाघ यांनी घेतलेल्या 30 लाखांच्या लोनची माहिती द्या. जे कर्ज मी घेतलंच नाही त्याची माहिती मागितली होती.”

“लोकांवरील 2011 पासूनच्या केसेस एसीबीकडे पेडिंग आहेत, त्यांच काय झालं? या केसमधल्या मुख्य आरोपी डॉ. गजानन भगतची अजून चौकशीच सुरू आहे आणि माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केला. मी न्यायालयात लढेन. फक्त चित्रा वाघचा नवरा आहे याची शिक्षा किशोर वाघांना दिली जात आहे.”

“मी तुम्हाला पुरून उरेल, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी मी रोज बोलणार. जोपर्यंत संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.”

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #SharadPawar #Myfather #Heisremembered #Chitrawagh, #शरदपवार #माझाबापच #त्यांचीआठवण #येतआहे #चित्रावाघ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माझे अनेक महिलांशी संबंध – प्रसिद्ध खेळाडू
Next Article शिवसेनेच्या खासदाराकडून सात वर्षांपासून छळवणूक, उच्चशिक्षित महिलेचा कोर्टात अर्ज दाखल

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?