Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंतप्रधान 14 जूनला महाराष्ट्र दौऱ्यावर; तुकोबांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

पंतप्रधान 14 जूनला महाराष्ट्र दौऱ्यावर; तुकोबांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण

Surajya Digital
Last updated: 2022/05/23 at 4:50 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढल्या महिन्यात (14 जून) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच मोदींना यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी देहू संस्थानाच्या विश्वस्तांसह भोसले यांनी मोदी यांची भेट घेतली होती. Prime Minister to visit Maharashtra on June 14; Dedication of Shila Temple of Tukoba Dehu Pune

पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदी याआधी 6 मार्चला पुण्यात मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आले होते. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांसह आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते.पंतप्रधान मोदी यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून 14 जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत. आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

ऐन वारीच्या तोंडावर पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा असेल. राज्यात आगामी काळात होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या दौऱ्याला महत्त्व असणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी थेट पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचतील.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

पंतप्रधान मोदी 14 जूनला देहूत येणार आहेत, आणि यंदाचा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 20 जूनपासून सुरु होईल. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे होऊ न शकलेला वारीचा सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात होणार आहे. त्याआधीच पंतप्रधान देहूत येत असल्याने या दौऱ्याचे विशेष महत्त्व असणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उद्या (24 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी क्वाड समिटमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जपानमध्ये क्वाड नेत्यांची दुसरी ​​शिखर परिषद होत आहे. या परिषदेत चारही देशांच्या नेत्यांकडून विकासाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलली जातील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. क्वाड अंतर्गत सुरु असलेल्या विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची ही उत्तम संधी असल्याचे मोदी म्हणाले.

ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अथनी अल्बानीस देखील पहिल्यांदाच क्वाड संमेलनात सहभागी होणार आहेत. त्यांच्याही सोबत द्वीपक्षीय बैठक करण्यास मी उत्सुक असून, सर्वसमावेशक राजनैतिक भागीदारी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुआयामी सहकार्य, तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर त्यांच्यासोबत या बैठकीत व्यापक चर्चा होऊ शकते.

 

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

TAGGED: #PrimeMinister #visit #Maharashtra #June #Dedication #Shila #Temple #Tukoba #Dehu #Pune, #पंतप्रधान #14जून #महाराष्ट्र #दौरा #तुकोबा #शिळा #मंदिर #लोकार्पण #देहू #पुणे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article died of heatstroke महाराष्ट्रात 11 दिवसांत उष्माघाताने 6 जणांचा मृत्यू
Next Article दक्षिण सोलापुरात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या  

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?