Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुख्यमंत्री शिंदे आषाढी यात्रेपूर्वीच अचानक पंढरपुरात दाखल होऊन घेतला आढावा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

मुख्यमंत्री शिंदे आषाढी यात्रेपूर्वीच अचानक पंढरपुरात दाखल होऊन घेतला आढावा

Surajya Digital
Last updated: 2023/06/25 at 8:34 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी यात्रेतील सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी आज रविवार सायंकाळच्या सुमारास पंढरपुरात दाखल झाले. तत्पूर्वी सोलापुरात दाखल होऊन नंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. Chief Minister Shinde Ashadhi suddenly entered Pandharpur before the Yatra and took stock

 

आषाढी एकादशी साेहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमाराला नांदेडहून साेलापूर विमानतळावर दाखल झाले.

साेलापुरात त्यांचा ताफा पंढरपूरकडे रवाना झाला. आषाढी एकादशीचा साेहळा २९ जून राेजी हाेणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करतात. एकादशीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्याचे पंढरपुरात आगमन हाेते. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा प्रथमच चार दिवस आधी पंढपुरात येत आहेत.

 

नियाेजित दाैऱ्यानुसार रविवारी नांदेड येथे रविवारी त्यांचा कार्यक्रम हाेता. हा कार्यक्रम संपवून मुख्यमंत्र्यांचे विमान साेलापुरात दाखल झाले. साेलापूर पाेलिसांना या दाैऱ्याची माहिती रविवारी दुपारी दाेन वाजता मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विमानतळ ते पंढरपूर या मार्गावर पाेलिस बंदाेबस्त लावण्यात आला.

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दर्शन रांग, वाखरी रिंगण साेहळ्याच्या स्थळावर पाहणी करणार आहेत. राज्याचे आराेग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून पंढरपुरात महाआराेग्य शिबीर हाेणार आहे. या शिबिराच्या तयारीची पाहणी करणार असल्याचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी सांगितले होते.

 

परंडा येथे पाच लाख नागरिकांची तपासणी करून विश्वविक्रम केलेल्या सावंत बंधूंनी त्याहीपेक्षा भव्य चारपट मोठे अर्थात २० लाख नागरिकांच्या तपासणीसाठी महाआरोग्य शिबिर पालखी मार्गावर तीन ठिकाणी आयोजित केले आहे. या रेकॉर्डब्रेक शिबिरासाठी ५ हजार डॉक्टरांचा ताफा असणार आहे. भक्तीच्या पालखी सोहळ्यात होणारा आरोग्याचा मेळा यंदा आकर्षण ठरणार आहे. यासही मुख्यमंत्री भेट देतील.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

शासकीय वाहनाने ते पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. पंढरपुरात पोहल्यानंतर ते पालखी तळ, विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी परिसर यासह आदी विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केल्याची माहिती आहे. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आषाढी वारीतील तयारी, आढावा व विविध उपाययोजना संदर्भात माहिती घेऊन आवश्यक त्या सुचना दिल्या.

आषाढी एकादशी २९ जून २०२३ रोजी होणार आहे. दोन्ही संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या असून २८ जून २०२३ रोजी पंढरपूर शहरात दाखल होणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री हे सहकुटुंब शासकीय महापूजेसाठी हजर राहतील असेही सांगण्यात आले. सध्या आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविक पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. दर्शनरांगेतील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

You Might Also Like

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवारांचे असंख्य कार्यकर्ते अजित पवारांकडे

काँग्रेसने पोस्ट केलेल्या पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओवर भाजपाची टीका

TAGGED: #ChiefMinister #Shinde #Ashadhi #suddenly #entered #Pandharpur #Yatra #took #solapur #stock, #मुख्यमंत्री #एकनाथशिंदे #विठुराया #महापूजा #बीड #नवले #कुटुंब #मानाच्या #वारकरी #मान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article टँकरच्या पाण्याने संत तुकारामांच्या पादुकांना नीरा नदीत स्नान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे गोल रिंगण उत्साहात
Next Article पालखीत वारकऱ्यांच्या अंगावर उडाले गरम डांबर; वारकरी संतप्त, दोषींवर कारवाईची मागणी

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?