Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ना – ना म्हणत लोकसभेची तयारी सुरू; सुशीलकुमार शिंदेंचे मुक्काम तसेच ग्रामीण दौरेही वाढले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

ना – ना म्हणत लोकसभेची तयारी सुरू; सुशीलकुमार शिंदेंचे मुक्काम तसेच ग्रामीण दौरेही वाढले

Surajya Digital
Last updated: 2023/02/15 at 6:13 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 श्रीकांत भारतीय यांनी सोलापुरात उदय पाटलांच्या घरी दिली भेट; भाजप प्रवेशाची चर्चा

• सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार यांचा शहरातील मुक्काम तसेच ग्रामीण भागातील दौरे वाढले आहेत. त्यामुळे ना ना म्हणत पुन्हा सुशीलकुमार शिंदे यांनी आतापान लोकसभेची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. Preparation for Lok Sabha begins by saying no – no; Sushilkumar Shinde’s stay as well as rural tours also increased Shrikant Bharatiya Udayashankar Patil

 

मागील दोन निवडणुकीत भाजपचे उमेदवार सोलापूर लोकसभेवर निवडून आले आहेत. खुद्द सुशीलकुमार शिंदे यांचा लाखापेक्षा जास्त मतांनी दोनवेळा येथून पराभव झाला आहे. शिवाय आता शहर मध्य आणि मोहोळ वगळता उर्वरित चार मतदारसंघात भाजपाचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे यंदाही लोकसभा काँग्रेसला अवघड असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच शिंदे यांनी दोन- तीनवेळा आपण निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

 

मात्र आता अचानक शिंदे यांचा सोलापूर शहरातील मुक्काम वाढला आहे. त्यांनी शहरातील मान्यवरांच्या भेटी गाठीही पुन्हा सुरू केल्या आहेत. तसेच मंगळवारी त्यांनी मंगळवेढा आणि मुस्ती या ग्रामीण भागाचाही दौरा केला. त्यामुळे शिंदे पुन्हा एकदा ना ना म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत उतरतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

● शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही

 

गेल्यावेळीही त्यांनी ना ना म्हणत लोकसभा निवडणूक लढली होती. सध्या काँग्रेसकडे सुशीलकुमार शिंदे यांच्याव्यतिरिक्त प्रणिती शिंदे या एकमेव ताकदवान उमेदवार आहेत. मात्र आ. शिंदे शहर मध्य मतदारसंघ सोडण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.

 

● लोकसभेपूर्वी महापालिका महत्त्वाची

सोलापूर लोकसभेपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक काँग्रेसच्यादृष्टीने महत्वाची आहे. एकेकाळी महापालिकेत वर्चस्व असलेल्या काँग्रेसचे गतनिवडणुकीत केवळ १४ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे आता जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आण्यासाठी आ. प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे या दोघांनीही लक्ष घातले आहे. त्यामुळे शिंदे यांचे सोलापूरचे दौरे वाढल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

》 श्रीकांत भारतीय यांनी सोलापुरात उदय पाटलांच्या घरी दिली भेट; भाजप प्रवेशाची चर्चा

सोलापूर : भाजपकडून ‘महाविजय २०२४ सुरू करण्यात आले असून याच्या प्रदेश संयोजक पदी आमदार श्रीकांत भारतीय यांची निवड करण्यात आली आहे. ते पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी मंगळवारी सकाळी युवा नेते उदय पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा पर भेट दिली.

या भेटीनंतर सोलापूर जिल्ह्यातील समर्थक कार्यकर्त्यांमध्ये भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उदय पाटील यांनी दक्षिणमधून २००४ साली सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना ३२ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. त्यामुळे ते आगामी काळात दक्षिणमधून पुन्हा आपले भवितव्य आजमावतील असे वाटत होते.

मात्र अचानक ते राजकारणातून गायब झाले. मात्र त्यांनी दादाश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले. आता पुन्हा त्यांनी राजकारणात कमबॅक केल्याची चर्चा सुरू झाली आहे. शहर उत्तरमध्ये त्यांनी लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. मध्यंतरी त्यांच्या घरी संभाजी भिडे यांनीही भेट दिली होती. आता मंगळवारी भाजपाचे आ. श्रीकांत भारतीय यांनीही भेट दिली आहे.

 

 

यावेळी उदय पाटील यांच्या घरी आ. भारतीय यांनी नाश्ता केला. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. उदय पाटील यांनी आ. भारतीय यांचा सत्कार केला. आ. भारतीय यांनी निवास्थानी भेट दिल्याने उदय पाटील पुन्हा चर्चेत आले आहेत. भारतीय यांच्याकडे ‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी दिली आहे. अशावेळी त्यांनी उदय पाटील यांच्या घरी भेट दियामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, उदय पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमधून होत आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #Preparation #solapur #Sabhasabha #bysaying #no-no #SushilkumarShinde's #stay #aswellas #rural #tours #increased #ShrikantBharatiya #UdayashankarPatil, #नाना #सोलापूर #लोकसभा #तयारीसुरू #सुशीलकुमारशिंदे #मुक्काम #ग्रामीण #दौरे #वाढले #उदयशंकरपाटील #श्रीकांतभारतीय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात गुजरात रबर फॅक्टरीला भीषण आग, मोठी वित्तहानी
Next Article पंढरीतील श्री विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी याचिका दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?