Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेनेच्यावतीने पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्याचा निषेध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शिवसेनेच्यावतीने पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्याचा निषेध

admin
Last updated: 2025/04/23 at 4:18 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अहिल्यानगर दि. 23 एप्रिल (हिं.स.) :- अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि शांती बिघडवणे. अशा लोकांशी संवाद साधणे, त्यांना समजावणे, हे उपाय अनेकदा अपयशी ठरले आहेत. जेव्हा संवाद आणि कायदेशीर प्रक्रिया अयशस्वी होतात तेव्हा कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात, असे कठोर निर्णय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे घेतीलच पण निष्पाप पर्यटकांची हत्या करणार्‍या अतिरेक्यांना घरात घुसून गोळ्या घातल्या पाहिजे. जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ला हा फक्त हिंदूस्थानातील हिंदूसाठी होता. अशा अतिरेक्यांना आणि त्यांना साथ देणार्‍यांना जसाच तसे उत्तर देण्यात यावे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी केले.

काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्याचा शहर शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध व्यक्त करुन निदर्शने करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, संजय शेंडगे, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, रामदास भोर, दत्ता कावरे, परेश लोखंडे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, सुरेश क्षिरसागर, ओंकार शिंदे, अरुण झेंडे, गौरव ढोणे, कैलास शिंदे, आण्णा घोलप, अभिजित अष्टेकर, रणजित परदेशी, संजय आव्हाड, अविनाश भिंगारदिवे, अक्षय भिंगारे आदी उपस्थित होते.

यावेळी संभाजी कदम म्हणाले की, पहलगाम येथील हल्याचा निषेध म्हणून आम्ही आज दिल्लीगेट येथे निदर्शने केले. पहलगाम येथील भ्याड हल्ला हा फक्त हिंदुस्थानातील हिंदूंसाठी होता जर हिंदूंवर असे भ्याड हल्ले होत असतील आता हिंदूही गप्प बसणार नाही. या हल्यामध्ये पर्यंटकांना विचारण्यात येत होते की, तु कुठला …. मी हिंदूस्थानातील आहे, आणि त्यातल्या त्यात हिंदू असणार्‍यांना गोळ्या घालत होते. हे अत्यंत दुदैवी आहे. अशा अतिरेक्यांना पकडून त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे.यावेळी दिलीप सातपुते म्हणाले की, अतिरेकी धर्म विचारुन गोळ्या घालत होते. यामध्ये हिंदस्थानातील अनेक हिंदू मारले गेले. या भ्याड हल्लाचा शहर शिवसेनाच्यावतीने निषेध करण्यात येत आहे.पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करुन त्या अतिरे क्यांना मारले पाहिजे, हिच खरी श्रद्धांजली ठरेल या हल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना, असे ते म्हणाले.यावेळी बाळा साहेब बोराटे, गणेश कवडे, शाम नळकांडे, गौरव ढोणे आदींनी या हल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी शहर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बलात्कार प्रकरणातील आरोपी सहा महिने उलटून ही मोकाट
Next Article पहेलगाम येथील अतिरेकी हल्ला हा मानवतेला काळीमा फासणारा – बाळासाहेब थोरात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?