Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेनेचा अजित पवारांना गंभीर इशारा, विनापरवाना पुण्यात शिवसेनेचा मेळावा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शिवसेनेचा अजित पवारांना गंभीर इशारा, विनापरवाना पुण्यात शिवसेनेचा मेळावा

Surajya Digital
Last updated: 2021/09/26 at 5:43 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

पुणे : शिवसेनेने आपलाच मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात इशारा दिला आहे. राज्यात आपली सत्ता आहे. पण आपलं इथं कोणी ऐकत नाही असं म्हणतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगावं लागेल की, मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत आज? अजित पवारांनी आमचं नाही ऐकलं तर मग अवघड होईल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवरुन शिवसेनेनं सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा पार पडला. यावेळी राऊत बोलत होते.  पिंपरी चिंचवड पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी नाकारली होती. तरी देखील शिवसेनेचे खासदार संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा हा मार्गदर्शन मेळावा पार पडला. अद्याप ही कोरोनाचे काही निर्बंध कायम आहेत. म्हणूनच पोलिसांनी ही परवानगी नाकारली होती. पण परवानगी झुगारून सेनेने हा मेळावा घेतलाच.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेवर असणारे कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल करत नाहीयेत, दुसरीकडे मात्र त्यांचे शिवसैनिक अशा प्रकारे नियमांना हरताळ फासत आहेत. मंचावर सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडालेले  तर मंचासमोर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांकडून मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.

खासदार संजय राऊत मेळाव्यात म्हणाले, पालकमंत्री आपले नाहीत, पण राज्यात आपली सत्ता आहे. पण आपलं इथं कोणी ऐकत नाही असं म्हणतात. मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री ही आपलेच आहेत. त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल. की मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत आज? पण थोडं थांबा चुकीचं लिहू नका. ते दिल्लीचा अंदाज घ्यायला गेलेत, कारण आम्हाला उद्या दिल्लीवर ही राज्य करायचं आहे. कोण कुठं बसतात हे पाहतायेत, तिथं आपल्याला पोहचायचे आहे. त्याचा अंदाज घेतायेत. त्यामुळं अजित दादांशी बोलू आपण, आपल्याला एकत्र काम करायचं आहे. ते ऐकतील नाहीतर अवघड होईल, असं संजय राऊत म्हणाले.

खासदाला राऊत आणखी म्हणाले की, भोसरी विधानसभेत शिवसेनेचा एक ही नगरसेवक निवडून आला नाही, ही मोठी खंत आहे. म्हणून भोसरीतून शिवसेनेला कामाची सुरुवात करायला हवी. येत्या महापालिकेत आपले असे नगरसेवक निवडून यायला हवेत, ज्यात आपण सत्तेतील महत्वाचे वाटकेरी असू. जसं राज्यात आहोत. आपण इतकीच माफक अपेक्षा करतोय. राज्यात महाविकासआघाडी आहे, मग महापौर पदाची आपण ईच्छा व्यक्त केली, तर त्यात काय चुकलं, असंही राऊत म्हणाले. आता संवाद साधू, आले तर सोबत नाहीतर एकटे लढू. आपण सगळ्या उमेदवारांची तयारी करू, असंही राऊत म्हणाले.

प्रभाग चारचा होता म्हणून आपल्याला फटका बसला. पण भाजप सत्तेत का आली? त्यांना याचा का फायदा झाला, याचा आपण विचार करायला हवा. मुंबईत जर आपला बोलबाला आहे पण त्या लगतच्या पुणे-पिंपरीत का होत नाही. ही खंत आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात येऊन घासून आले, मग आपण ठासून येऊ. कोल्हापूरचा गडी पुण्यात आला की कोथरूडमध्ये आला आपल्याला काही फरक पडत नाही. पण आमच्या अंगावर येऊ नका, असा इशारा त्यांनी चंद्रकांत पाटलांना दिला.

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांनी आपल्याला सगळ्या पदावर बसवलं. या पक्षात निष्ठेला खूप महत्व आहे.  मंचावर बसलेल्या प्रत्येकाला पदं मिळाली आहेत, पण समोर बसलेल्यांना एक ही पद नाही मिळत, ते आहेत म्हणून आपण आहोत. मी दिल्लीतला पत्ता काय सांगतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर संजय राऊत राहतो. ही देण बाळासाहेबांची आहे. मला म्हणून तर दिल्लीत खूप ओळखतात. आता हेच मोदी साहेबांना विचारलं तर कदाचित ते म्हणतील मी खासदार संजय राऊतांच्या समोर राहतो, असं मिश्किलपणे राऊत म्हणाले. यावेळी एकच हशा पिकला.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #ShivSena's #serious #warning #AjitPawar #Rally #Pune #permission, #शिवसेना #अजितपवार #गंभीर #इशारा #विनापरवाना #शिवसेनेचा #मेळावा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोदींनी देशाला दिला नवा इव्हेंट, ‘नदी दिवस’ साजरा करण्याचं आवाहन
Next Article बार्शीत पिकांचे अतोनात नुकसान तर बक्षीहिप्परगे – दहिटणे मार्गावरच्या ओढ्यात वाहून दोन बैलांचा मृत्यू, भरपाई देण्याची मागणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?