Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोठी घोषणा; शिवसेना बंगालची निवडणूक लढणार नाही, ममतांना साथ देणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

मोठी घोषणा; शिवसेना बंगालची निवडणूक लढणार नाही, ममतांना साथ देणार

Surajya Digital
Last updated: 2021/03/04 at 6:22 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. शिवसेना पश्चिम बंगालची निवडणूक लढणार नाही. आमचं ममतांना समर्थन असेल, अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विट करून दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. ‘आम्हाला आशा आहे की, ममता दीदींची डरकाळी पुन्हा एकदा यशस्वी होईल. कारण त्या खऱ्या बंगाली टायगर आहेत’, असं ते म्हणाले.

ममता बॅनर्जी खऱ्या बंगालच्या वाघीण आहेत, त्यामुळे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक न लढता त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय होवो अशी आमची इच्छा आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. ममता बॅनर्जी खऱ्या बंगालच्या वाघीण आहेत, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये निवडणूक न लढता त्यांना पाठिंबा देण्याचं शिवसेनेने ठरवलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 26 फेब्रुवारी पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. परंतु  पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीकडे नजरा लागल्या आहेत.

* ममताच खऱ्या बंगालच्या वाघीण

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “शिवसेना पश्चिम बंगाल निवडणूक लढवणार की नाही याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. पक्षाचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली. सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सर्व असा सामना रंगलेला दिसत आहे. सर्व एम – मनी, मसल अॅण्ड मीडिया (पैसा, ताकद आणि मीडिया) चा वापर ममता दीदींविरोधात वापरलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय होवो, कारण आम्हाला वाटतं की त्याच खऱ्या बंगालच्या वाघीण आहेत.

You Might Also Like

पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही

ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला

येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे

अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

TAGGED: #ShivSena #notcontest #Bengalelections #supportMamata, #मोठीघोषणा #शिवसेना #बंगालची #निवडणूक #लढणारनाही #ममतांना #साथदेणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रभू श्रीरामाने भाजपला कंत्राट दिले आहे का ? – नाना पटोले
Next Article ‘परीक्षा संपेपर्यंत थांबा’ म्हटल्यावरही सोलापुरातील मुलींच्या आयटीआयची वीज तोडली

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?