नांदेड, 2 ऑगस्ट – नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा, तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट दिली. त्यांनी शीख धर्मियांचे 10 वे गुरु, श्री गुरु गोविंदसिंहजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
या भेटीवेळी भाजपा खासदार डॉ. अजित घोरपडे, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, भाजपा नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख, व्यंकटेश साठे, माजी अध्यक्ष प्रवीण साले, डॉ. सचिन उमरेकर, सरचिटणीस दिलीपसिंह सोडी, विजय गंभीरे, अमोल कदम, विजय येवनकर, गुरदीपसिंह संधू, अमरजीतसिंग कुजीवाले, सुखासिंह हुंडल, व्यंकटेश जिंदम आणि सोशल मीडिया प्रदेश सदस्य राज यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.