लातूर, 14 ऑगस्ट – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त बाभळगाव येथील विलास बागेत असलेल्या स्मृतीस्थळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विलास साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली विलासराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीप राव देशमुख, लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.