Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवपुत्र संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांच्या मनावर कोरला जाईल – विजयसिंह मोहिते – पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

शिवपुत्र संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांच्या मनावर कोरला जाईल – विजयसिंह मोहिते – पाटील

Surajya Digital
Last updated: 2022/05/09 at 8:55 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ महानाट्यात २५ हजारांहून अधिक नागरिकांनी नोंदविला उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूर  : छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी अभिजीत आबा पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजी या महानाट्याचे आयोजन केले आहे. या महानाट्यात २५ हजारांहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांनी गौरवोद्गार काढले. History of Shivputra Sambhaji Maharaj will be engraved on everyone’s mind – Vijay Singh Mohite – Patil Former Deputy Chief Minister

लेखक दिग्दर्शक निर्माते महिंद्र वसंतराव महाडिक लिखीत शिवपुत्र संभाजी महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक महानाट्याचा चौथा प्रयोग  पार पडला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार दत्तात्रय सावंत, धनश्री परिवारांचे अध्यक्ष शिवाजीराव कांळुगे सर, जकराया साखर कारखान्याचे चेअरमन बिराप्पा जाधव,  पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, उस्मानाबाद युवासेने नेते अतिश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या चौथ्या प्रयोगाचे उद्घाटन पार पडले.

अभिजित पाटलांनी हे जे महानाट्य आयोजित केले आहे, या महानाट्यामुळे संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांच्या मनावर कोरला जाईल. अभिजीत पाटलांच्या या कार्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करत असल्याचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

https://www.facebook.com/109399567404448/posts/537346691276398/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

याचबरोबर आमदार समाधान आवताडे यांनीही अभिजीत पाटलांच्या कार्याचे कौतुक करत स्तुतिसुमने उधळली. मागील दोन वर्षांपासून संपूर्ण देश हा कोरोनाने त्रस्त झाला होता. एकमेकांच्या गाठी भेटी बंद झाल्या होत्या, परंतु अभिजीत आबांनी या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करून सर्वांना एकत्रित आणण्याचे व घराघरात छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास नेण्याचे काम केले आहे, असे म्हणत अभिजीत पाटलांच्या सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्राच्या वाटचालीस शुभेच्छा देखील समाधान आवताडे यांनी दिल्या.

इतकेच नव्हे तर, या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करून अभिजीत पाटलांनी सोलापूर जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा जपला आहे. अभिजीत पाटील  यांनी केवळ पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची सामाजिक बांधिलकी जपत या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन केले. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले असल्याचे मत माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले. याचबरोबर पंढरपूर, सोलापूर नव्हे तर संपूर्ण राज्यातून जवळपास पंचवीस हजारांपेक्षा जास्त शिवप्रेमी, नागरिकांनी या ऐतिहासिक महानाट्याला उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/537263591284708/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #History #Shivputra #Sambhaji #Maharaj #engraved #everyone'smind #VijaySinghMohitePatil #Former #DeputyChiefMinister, #पंढरपूर #अभिजितपाटील #Pandharpur #Abhijeetpatil, #शिवपुत्र #संभाजी #महाराज #इतिहास #मनावर #कोरला #माजीउपमुख्यमंत्री #विजयसिंहमोहितेपाटील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Nagpur fire नागपूर हादरले, 15 सिलिंडरचे स्फोट, शंभर झोपड्यांचे नुकसान, मीडियावर हल्ला
Next Article … या तारखेला दहावी-बारावीचा निकाल !

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?