Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बंदुकीचा ‘धाक’ दाखवत शिवसैनिकाने केली गाडी ‘ओव्हारटेक’, व्हिडिओ झाला व्हायरल, भाजपची टीका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

बंदुकीचा ‘धाक’ दाखवत शिवसैनिकाने केली गाडी ‘ओव्हारटेक’, व्हिडिओ झाला व्हायरल, भाजपची टीका

Surajya Digital
Last updated: 2021/01/30 at 6:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक कारचालक बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे या गाडीच्या मागील बाजूस शिवसेनेची ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या भगव्या रंगाच्या नकाशावर वाघ असं चिन्ह दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून खळबळ उडाली आहे.

या व्हिडिओमध्ये, ट्रकच्या गर्दीमधून वाट काढण्यासाठी एक कारचालक ड्रायव्हिंग सीटवरुन उजव्या हातात पकडलेली रिव्हॉलव्हर गाडीच्या खिडकीबाहेर काढतो आणि ट्रकच्या रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो.  या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

इम्तियाज जलील यांनी ही व्हिडिओ पोस्ट गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलिसांना टॅग केली आहे. हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे! वाहनावरील लोगो हे सर्व सांगते! शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का? असा सवालही जलील यांनी या पोस्टद्वारे उपस्थित केला आहे. या वाहनामध्ये शिवसैनिक असल्याचे बोलले जात आहे, तर शिवसेनेकडून अद्दाप कोणती प्रतिक्रिया आलेली नाही.

* भाजपकडून शिवसेनेवर टीका

या प्रकारावरुन  भाजपनेही  शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ते पाहता राज्याचे युवा नेतृत्व सरकारमध्ये बसून पब, पार्टी आणि फिल्मी दुनियेचा पुरस्कार करतं, त्यावेळी कार्यकर्ते रस्त्यावर नंगानाच करून गोली मारो भेजेमे अशा स्टाईलने वागतात,’ अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनीही यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्र मध्ये ? असा सवाल नीलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #बंदुकीचा #धाकदाखवत #शिवसैनिकाने #गाडीओव्हारटेक #व्हिडिओझालाव्हायरल #भाजपची #टीका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तुमच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना कसे पाठीशी घातले, सर्व डिटेल्स देईन, अण्णांचा शिवसेनेला इशारा
Next Article ‘नवीन कृषी कायद्यांमुळे मार्केट कमिट्यांच्या अधिकारांवर गदा’

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?