Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दुःखद ! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

दुःखद ! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यात निधन

Surajya Digital
Last updated: 2021/11/15 at 7:37 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयाने याविषयी माहिती दिली आहे. पुण्यात आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून बाबासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव 8.30 वाजता त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी सासवड येथे झाला. त्यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक दस्ताऐवज, गडकिल्ले, मराठा सम्राज्याचा अभ्यास केला. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळासोबत सुद्धा त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम केले होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या १०० वर्षांच्या जीवनकाळात महाराष्ट्रात पिंजून काढला. या काळात त्यांनी गडकिल्ले फिरत शिवचरित्राचा सखोल अभ्यास केला. त्याचबरोबर अनेक पुस्तकं लिहिली तसेच ‘फुलवंती’ आणि ‘जाणता राजा’ ही नाटकं लिहून त्यांचं दिग्दर्शनही केलं. ‘जाणता राजा’ या महानाट्याचे गेल्या ३७ वर्षात १२५० हून अधिक प्रयोग झाले.

तारुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संपर्क, प्र. के. अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन, श्री. ग . माजगावकर यांच्यासोबत ‘माणूस’ साप्ताहिकात काम, महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर भटकंती आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्ताऐवजांचा अभ्यास, दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात सहभाग, असा त्याचा कार्यकाळ आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तर आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदर्‍यांचा सरकारवाडा, पुरंदर्‍यांची नौबत, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजर्‍याचे मानकरी, राजगड, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, लालमहाल, शिलंगणाचं सोनं, शेलारखिंड, सावित्री, सिंहगड असे लेखन केले आहे.

काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. काल रविवारी, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला असून प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान आज पहाटे निधन झाले.

* शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय

– बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला.

– इतिहासाविषयी अभिमान, संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा- वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे.

– प्रखर बुद्धिमत्ता, विश्लेषणक्षमता, प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतात.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Sad #Shivshahir #BabasahebPurandare #passedaway #Pune #morning, #दुःखद #शिवशाहीर #बाबासाहेबपुरंदरे #पहाटे #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नगरसेविकेची गळफास घेऊन आत्महत्या; मंगळवेढ्यातील हल्ल्याप्रकरणी आरोपीस कोठडी
Next Article उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा; राज्यात सुख शांती नांदावी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?