Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंत्रीपद देतानाही भाजप धक्कातंत्र अवलंबणार ? कोण मंत्री, कोण पालकमंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मंत्रीपद देतानाही भाजप धक्कातंत्र अवलंबणार ? कोण मंत्री, कोण पालकमंत्री

Surajya Digital
Last updated: 2022/09/14 at 5:44 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ कोण मंत्री ? कोण पालकमंत्री

सोलापूर /अजित उंब्रजकर

नुकतेच सोलापूर जिल्हा भाजप अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड करताना भाजपने एक प्रकारे सर्वांना धक्का दिला आहे. जिल्ह्यातील धैर्यशील मोहिते पाटील, शहाजी पवार, संतोष पाटील यांच्यासह अनेक जण इच्छुक असतानाही भाजपने युवा नेता म्हणून सचिन कल्याणशेट्टी यांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपचे धक्का तंत्र अद्यापही सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद देतानाही भाजप असा धक्का देणार का याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. Will BJP adopt shock tactics even after giving ministerial post? Who is the minister, who is the guardian minister

भाजप आणि शिंदे सेना सरकार आल्यापासून भाजपचे धक्का तंत्र सुरूच आहे. सुरुवातीला भाजपने देवेंद्र फडणवीस यांना अचानक उपमुख्यमंत्रीपदी नेमले हा एक प्रकारे सर्वांना धक्काच बसला होता. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदीही राहुल नार्वेकर यांची निवड करून भाजपने एक प्रकारे धक्का हे धक्का दिला आहे.

याशिवाय मंत्रिमंडळ विस्तारात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना खाते देतानाही धक्का तंत्राचा अवलंब केला. गेल्या मंत्रिमंडळात चंद्रकांत दादांनी यांच्याकडे दोन नंबरचे महसूल खाते होते. आता त्यांना शिक्षण खाते देण्यात आले आहे तर मुनगंटीवार यांच्याकडे महत्त्वाचे अर्थ खाते होते आता त्यांच्याकडे वन विभागाचा कार्यभार दिला आहे. हा भाजपने दिलेला एक प्रकारे
धक्काच आहे.

 

अशीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातही झाली आहे. श्रीकांत देशमुख यांच्या प्रकारानंतर सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुमारे महिनाभर चालली होती. यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, संतोष पाटील, माऊली हळणवरकर यांच्यासह अनेकांची नावे पुढे येत होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

मात्र अक्कलकोटचे युवा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करत भाजपने एक प्रकारे सर्वांना धक्का दिला आहे. वास्तविक पाहता सध्या भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश करत आहेत. सध्या जिल्ह्यात भाजपचे तब्बल आठ आमदार आहेत तर दोन खासदार आहेत.

या सर्वांमध्ये सचिन कल्याणशेट्टी वयाने आणि अनुभवाने ही कमी आहेत. तरीही त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करत भाजपने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्येही भाजप असाच धक्का देणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

 

□ कोण मंत्री ? कोण पालकमंत्री

 

सध्या सोलापूर जिल्ह्यातून मंत्री पदासाठी आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या तिघांची नावे प्रामुख्याने पुढे येत आहेत. मात्र भाजपचे धक्का तंत्र पाहता अचानकपणे आमदार राम सातपुते अथवा आमदार राजेंद्र राऊत यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मंत्रीपद किती मिळणार आणि कोणाला मिळणार आणि पालकमंत्री कोण होणार याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #BJP #adopt #shock #tactics #ministerial #post #minister #guardianminister #political, #सोलापूर #मंत्रीपद #भाजप #धक्कातंत्र #अवलंबणार #कोणमंत्री #कोण #पालकमंत्री #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सोमवारी सोलापूर दौऱ्यावर, कुर्डूवाडी दौरा ठरला
Next Article गुजरातपेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणणार- वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?