Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धक्कादायक – कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट, 68,020 रुग्ण आढळले, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

धक्कादायक – कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट, 68,020 रुग्ण आढळले, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

Surajya Digital
Last updated: 2021/03/30 at 9:21 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली / मुंबई : देशात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. गेल्या 24 तासात भारतात तब्बल 68,020 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 32,231 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 291 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या देशात 5,21,808 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा.

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार पहायला मिळत आहे. काल राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पहायला मिळाली होती. आज त्यामध्ये काहीशी घट झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या कालच्या संख्येच्या तुलनेत घट झाली असली तरी धोका कायम आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबवण्यात येत आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 31 हजार 343 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 102 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज राज्यात 20 हजार 854 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत 23 लाख 53 हजार 307 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.71 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 102 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 54 हजार 283 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.98 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 3 लाख 36 हजार 584 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 59 हजार 475 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 94 लाख 95 हजार 189 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 27 लाख 45 हजार 58 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.08 टक्के आहे. सध्या राज्यात 16 लाख 07 हजार 415 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 16 हजार 614 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

* राज्यात सर्वाधिक रुग्ण असलेले शहर

देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 59475, मुंबई 46248, ठाणे 35264, नाशिक 26553, औरंगाबाद 21282, नांदेड 15171, नागपूर 45322, जळगाव 6602, अहमदनगर 7952 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

TAGGED: #Shocking #corona #patient #explosion #mostpatients #inMaharashtra, #धक्कादायक #कोरोना #रुग्णसंख्येचा #विस्फोट #सर्वाधिकरुग्ण #महाराष्ट्रात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फॅक्ट चेक- अजय देवगनला मारहाण ? वाचा सविस्तर काय आहे प्रकरण
Next Article एक वर्ष लोक कसे जगले हे ‘मातोश्री’मध्ये राहून समजणार नाही

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?