वॉशिंग्टन, २८ ऑगस्ट. अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरातील एका कॅथोलिक शाळेत बुधवारी (२७ ऑगस्ट २०२७) एक दहशतवादी हल्ला झाला. प्राथमिक तपासानंतर एफबीआयने या गोळीबाराला दहशतवादी घटना घोषित करत म्हटले आहे की, या हल्ल्यामागे देशांतर्गत आतंकवाद आणि धार्मिक द्वेष कारणीभूत आहे. मिनियापोलिसमधील या शाळेमध्ये बुधवारी प्रार्थनेदरम्यान मोठा गोंधळ उडाला होता, जेव्हा चर्चच्या खिडक्यांमधून आत बसलेल्या मुलांवर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. या हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू झाला, तर १७ हून अधिक जण जखमी झाले. नंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
शूटरच्या बंदुकांवर “Nuke India” (भारतावर अणुबॉम्ब टाका) आणि “माशा अल्लाह” असे लिहिले होते. तसेच, बंदुकीच्या मॅगझिनवर “डोनाल्ड ट्रम्पला ठार मारा” आणि “इझरायलचा नाश झाला पाहिजे” असे संदेशही लिहिलेले होते. Nuke India चा अर्थ आहे भारतावर अणुहल्ला करणे. असा विश्वास आहे की शूटर काही कट्टरपंथी इस्लामिक विचारधारेने प्रभावित झाला होता.
हल्ल्यापूर्वी वेस्टमॅनने आपल्या नावाने यूट्यूब चॅनलवर काही व्हिडिओ अपलोड केले होते. या व्हिडिओंमध्ये त्याने रायफल, शॉटगन आणि पिस्तूलसारख्या शस्त्रांचा साठा दाखवला होता. त्याने सांगितले होते की, “ही छोटी बंदूक माझ्यासाठी आहे. गरज भासल्यास वापरेन.” शस्त्रांवर लिहिलेले नारे त्याच्या अतिशय कट्टर आणि द्वेषपूर्ण मानसिकतेचे दर्शन घडवत होते. त्याने या व्हिडिओमध्ये दोन डायऱ्यांचा उल्लेख केला — एक ६० पानांची आणि दुसरी १५० पानांची, आणि दोन्ही पूर्णतः सिरिलिक भाषेत लिहिल्या होत्या. अधिकाऱ्यांच्या मते, ही जर्नल्स त्याच्या हिंसक विचारसरणी आणि द्वेषाचे पुरावे आहेत.
रॉबिन वेस्टमॅन एक ट्रान्सजेंडर होता. अलीकडेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रान्सजेंडर अधिकारांवर निर्बंध आणणारे काही निर्णय घेतले होते. असे मानले जात आहे की या धोरणांमुळे वेस्टमॅनमध्ये अधिक रोष आणि असंतोष निर्माण झाला. त्याच्या शस्त्रांवर ट्रम्पविरोधी लिहिलेले धमकीवजा संदेश त्याच्या राजकीय विरोधाची स्पष्ट साक्ष देतात.