Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री सिध्देश्वर यात्रेत वासराची भाकणूक, आज शोभेचे दारूकाम, लेझर शो
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

श्री सिध्देश्वर यात्रेत वासराची भाकणूक, आज शोभेचे दारूकाम, लेझर शो

Surajya Digital
Last updated: 2023/01/16 at 3:39 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ यंदाही पाऊसमान चांगला पण नैसर्गिक संकटाचे संकेत

 

Contents
□ यंदाही पाऊसमान चांगला पण नैसर्गिक संकटाचे संकेतस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी रविवारी रात्री होमविधी पार पडल्यानंतर भगिनी समाजजवळ मानकरी देशमुख यांच्या घरातून आणलेल्या वासराची रात्री १२ वाजून ४८ मिनिटांनी भाकणूक झाली.  Veal prediction in Shri Siddheshwar Yatra, Aaj Sobeshe Darukam, Laser Show Solapur यावेळी वासराने मलमूत्र विसर्जन केले. त्यावरून यंदाही पाऊस चांगला होणार असल्याचे भाकीत नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केले.

 

वासरासमोर गूळ, गाजर, ऊस, तांदूळ, गहू यासह अन्य विविध वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र यापैकी कोणत्याही वस्तूला वासराने स्पर्श केला नाही. त्यामुळे शेतमालाचे दर स्थिर राहणार आणि पूजेच्यावेळी वासरू बिथरले होते. त्यावरुन देशात नैसर्गिक संकट येऊ शकते, असा अंदाज यावेळी मानकऱ्यांनी व्यक्त केला.

भाकणूक ऐकण्यासाठी सिध्देश्वरभक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. वासराने मलमूत्र विसर्जन करताच उपस्थितांनी श्री सिध्देश्वरांचा जयघोष केला. येणाऱ्या हंगामात चांगला पाऊस होणार असल्याने भक्तांनी आनंद व्यक्त केला. गेली दोन वर्षे खरीप आणि रब्बी हंगामात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची टंचाई जाणवली नाही. यंदाही चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेतील तिसऱ्या दिवशी काल रविवारी रात्री ११.३० वाजता मानाच्या सातही नंदीध्वजांच्या साक्षीने येथील होम मैदानावरील होमकुंडात होमविधीचा धार्मिक सोहळा मंगलमय वातावरणात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत, अत्यंत भक्तिभावाने पार पडला. यावेळी सिध्देश्वर भक्तांनी ‘बोला बोला एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, श्री सिध्देश्वर महाराज की जय हर्रऽऽ’ असा जयघोष करून आसमंत दुमदुमून टाकला. होमविधीसाठी आलेल्या भाविकांमुळे होम मैदान फुलून गेले होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यात मानकरी हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते मानाच्या नंदीध्वजांची पूजा झाली. त्यानंतर होम मैदानावर होणाऱ्या होम विधीसाठी मानाच्या सातही नंदीध्वजांच्या सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक मार्गावर भाविकांनी नंदीध्वज व पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी व फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या.

 

श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीच्यावतीने आज सोमवारी रात्री आठ वाजता होम मैदानावर ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त शोभेच्या दारूकामाची आतषबाजी आणि लेझर शो चे आयोजन केले आहे.

पन्नास बाय चाळीस फूट अशा भव्य पडद्यावर लेझर शो दाखवण्यात येणार असून, या लेझर शोमध्ये बालयोगी श्रीसिध्दरामेश्वरांचा जन्म, श्री मल्लव्यांनी श्री सिध्दरामेश्वरांच्या हातून हुरडा खातानाचा प्रसंग, श्रीशैल पर्वतावरील श्री मल्लिकार्जुन यांच्याकडून श्री सिध्दरामेश्वरांनी घेतलेली दीक्षा, श्री मल्लिकार्जुन व श्री सिध्दरामेश्वर यांच्या झालेला दैवी संवाद व श्री सिध्दरामेश्वरांनी सोन्नलगीमध्ये म्हणजे आजच्या सोलापूरमध्ये केलेले कार्य अशा अनेक गोष्टींवर लेझर शोमधून माहिती दिली जाणार आहे.

या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले आहे.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Veal #prediction #ShriSiddheshwarYatra #Sobeshe #Darukam #LaserShow #Solapur, #सोलापूर #श्रीसिध्देश्वर #यात्रा #वासराची #भाकणूक #शोभेचे #दारूकाम #लेझरशो
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article परिचारक – भालके समविचारी आघाडीने वाढवली आमदार अवताडेंची डोकेदुखी
Next Article Murder Case चिप्पा मार्केट खून प्रकरण :  मृताची ओळख पटली, लहानपणीच्या मित्रानी केला मित्राचा घात

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?