Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक

admin
Last updated: 2025/06/25 at 4:01 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंग्टन , 25 जून (हिं.स.)। भारताचे अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी बुधवारी (२५ जून) दुपारी १२.०१ वाजता एक नवा इतिहास रचला. शुभांशू यांनी अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी उड्डाण केलं.यावेळी शुभांशू शुक्ला निरोप देताना त्यांच्या आई भावुक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळयानाने उड्डाण घेताच त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले.

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे ऐतिहासिक अंतराळ उड्डाणासाठी रवाना झाले आहेत. यापूर्वी अ‍ॅक्सिओम-४ मोहीम अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी निघालेल्या या भारतीय सुपुत्राने केवळ देशाचेच नाही तर त्यांच्या कुटुंबाचेही नाव मोठं केलं आहे. अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचा हा क्षण त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप भावनिक होता. शुभांशू शुक्ला हे अंतराळयातून अवकाशात झेपावताच त्यांच्या आईला रडू कोसळलं. मुलाच्या काळजीपोटी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. हा क्षण अनुभवताना त्या स्वतःला धीर देत होत्या. त्यांचा हा भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

यशस्वी प्रक्षेपणानंतर शुभांशू शुक्लांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या आई आशा शुक्ला त्यांच्या भावना व्यक्त करताना भावनिक झाल्या. “आम्हाला आमच्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. आम्हाला शुभांशूबद्दल कोणतीही भीती नाही. आम्हाला खूप आनंद आहे, खूप अभिमान आहे हे आनंदाश्रू आहेत,” असं आशा शुक्ला म्हणाल्या.

दरम्यान, या ऐतिहासिक क्षणाचे सेलिब्रेशन करण्यासाठी, शुभांशू यांचे पालक, शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसह लाईव्ह लाँचिंग पाहत होते. या प्रसंगी त्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेने एक बँड आणि विशेष सजावटीची व्यवस्था केली. दुसरीकडे, शुभांशू यांचे वडील शंभू दयाळ शुक्ला म्हणाले, “ही कामगिरी केवळ लखनऊसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची आहे. आम्ही सर्वजण खूप उत्साहित आहोत. हा क्षण आमच्यासाठी खूप खास आहे. आमचे आशीर्वाद नेहमीच त्याच्यासोबत आहेत.”

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण
Next Article विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?