Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शुभमन गिलने गावस्कर आणि सोबर्सचे विक्रम मोडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

शुभमन गिलने गावस्कर आणि सोबर्सचे विक्रम मोडले

admin
Last updated: 2025/08/01 at 5:06 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

लंडन, 1 ऑगस्ट – भारत-इंग्लंड यांच्यात ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिल मोठा विक्रमवीर ठरला आहे. पहिल्या दिवशी तो फक्त २१ धावांवर बाद झाला, तरी या खेळीसह त्याने सुनील गावस्कर आणि सर गॅरी सोबर्स यांचे दशकांपूर्वीचे विक्रम मोडले.

Contents
कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधारइंग्लंडमध्ये परदेशी कर्णधाराचा विक्रमही गाठलाधावबाद होऊन परतला गिलपावसाचा अडथळा

कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार

या धावांसह गिलच्या चालू मालिकेतील धावसंख्या ७४३ इतकी झाली. तो आता कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. गावस्करांनी १९७८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ६ कसोट्यांत ७३२ धावा केल्या होत्या.

इंग्लंडमध्ये परदेशी कर्णधाराचा विक्रमही गाठला

शुभमन गिल इंग्लंडमधील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा परदेशी कर्णधार ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज सर गॅरी सोबर्सचा विक्रम मागे टाकला. सोबर्स यांनी १९६६ मध्ये ७२२ धावा केल्या होत्या.

धावबाद होऊन परतला गिल

२८व्या षटकात गिल धावबाद झाला. गस अ‍ॅटकिन्सनने टाकलेल्या चेंडूवर गिलने बचावात्मक फटका मारून धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण नॉन-स्ट्रायकर एंडवरील साई सुदर्शनने नकार दिला. गिल परतताना अ‍ॅटकिन्सनने चेंडू थेट स्टंपवर मारत त्याला बाद केले.

पावसाचा अडथळा

या कसोटीत पावसाने खेळात अडथळा आणला. नाणेफेकीला १० मिनिटांचा उशीर झाला. पहिला सत्र नियोजित वेळेपेक्षा आठ मिनिटे आधी थांबवावा लागला. दुसरे सत्रही उशिरा सुरू झाले आणि केवळ अर्धा तास खेळल्यानंतर पुन्हा पाऊस पडला. शेवटी तिसरे सत्र रात्री उशिरा सुरू करण्यात आले.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article छ. संभाजीनगर : महिला छेडछाडीवरून झालेला तणाव अखेर निवळला
Next Article तब्बल १७ हजार कोटींच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणात अनिल अंबानींना ईडीचे समन्स

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?