Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलकडे भारतीय संघाची धुरा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलकडे भारतीय संघाची धुरा

admin
Last updated: 2025/05/24 at 6:08 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 24 मे (हिं.स.) – आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे यंदा संघाच्या कर्णधार पदाची धुरा शुभमन गिलकडे, तर ऋषभ पंत हा उपकर्णधार असेल. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर केली.

काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला खेळावे लागणार आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला कसोटी क्रिकेट संघात तरुण नेतृत्व आणि नव्या दमाचे खेळाडू हवे होते. त्यामुळे गौतम गंभीर हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला भारतीय संघात खेळवण्यासाठी उत्सुक नव्हता. विराट कोहलीला संघात स्थान मिळाले असते तरी त्याच्याकडे कर्णधारपद नसते. यामुळेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ – शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, करुण नायर, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, कुलदीप यादव, के एल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी

भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला आगामी मालिकेतून वगळण्यात आले आहे. स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला देखील संधी मिळाली नाही. याशिवाय ज्या नावांची घोषणा झालेली नाही त्यांच्याबद्दल बरीच चर्चा सुरू झाली. यापैकी एक नाव म्हणजे सरफराज खान. या दौऱ्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती आणि त्याची फिटनेसही दाखवली होती.

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

सामन्यांचा तपशील

पहिली कसोटी : 20-24 जून 2025 – हेडिंग्ले, लीड्स, दुसरी कसोटी : 2-6 जुलै 2025 – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम, तिसरी कसोटी : 10-14 जुलै 2025 – लॉर्ड्स, लंडन, चौथी कसोटी : 23-27 जुलै 2025 – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर, पाचवी कसोटी : 31 जुलै-4 ऑगस्ट 2025 – द ओव्हल, लंडन

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जम्मू-काश्मीर : राहुल गांधींनी घेतली पिडीतांची भेट
Next Article ग्रापं कर्मचारी कै.दादासाहेब श्रीराम यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द

Latest News

Почему переживание угрозы создает жизнь увлекательнее
Top News December 12, 2025
Отчего ожидание исхода порождает душевное стресс
Top News December 12, 2025
Почему человек имеют тенденцию выявлять закономерности в удаче
Top News December 12, 2025
Зачем человеку нравится играть с шансами
Top News December 12, 2025
Механизм действия механизм вознаграждения в мозговых структурах
Top News December 12, 2025
Механизм действия механизм поощрения в головном мозге
Top News December 12, 2025
Beste online Casinos Liste: Übersicht Top 25 Deutschland
Top News December 11, 2025
Отчего даже крохотный успех создает радость
Top News December 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?