Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सिद्धेश्वर कारखान्याजवळ सत्तुरने मारहाण; टँकर चालक जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सिद्धेश्वर कारखान्याजवळ सत्तुरने मारहाण; टँकर चालक जखमी

Surajya Digital
Last updated: 2021/12/21 at 1:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर – ट्रॅक्टरला कट मारल्याच्या किरकोळ भांडणातून सत्तुरने केलेल्या मारहाणीत अजित विलास कोडगे (वय ३० रा.तोंडले ता. माळशिरस) हा टँकर चालक जखमी झाला. ही घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास सिद्धेश्वर कारखाना येथील वजन काट्या जवळ घडली.त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अजित कोडगे हा त्याचा टँकर घेऊन कारखाना येथील काट्याजवळ वजन करण्यासाठी जात होता. त्यावेळी उस वाहतुकीचा एमएच१३-एजी-०६६८ या क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाने आपल्या वाहनास कट मारल्याच्या कारणावरून  भांडण केले. आणि त्याच्या हातावर सतुर ने मारहाण केली. अशी नोंद एमआयडिसी पोलिसात झाली आहे .

* जुळे सोलापुरात विवाहीत इसमाची गळफासाने आत्महत्या

सोलापूर – जुळे सोलापुरातील प्रसाद नगरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहित इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २०) दुपारच्या सुमारास घडली.

ज्ञानेश्वर भागवत देवकते ( वय३२ रा. प्रसादनगर) असे मयताचे नाव आहे. त्याने आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरातील पहिल्या मजल्यावर छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार वाल्मिकी पुढील तपास करीत आहेत.

* अकोलेकाटी येथे महिलेस मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा

अकोलेकाटी (ता.उत्तर सोलापूर) येथे वडीलाच्या भांडणात मधे का पडली. या कारणावरून काठी दगड आणि खुरपीने केलेल्या मारहाणीत सुचिता महादेव कदम (वय २७ रा.अकोलेकाटी) ही महिला जखमी झाली. ही घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात तालुका पोलिसांनी संजय सुधाकर शिरसागर त्याचा मुलगा भैय्या (दोघे रा. साठेचाळ) आणि सुहास सावंत (रा. बीबीदारफळ) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार क्षीरसागर पुढील तपास करीत आहेत .

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* खेड येथे फायटर ने मारहाण ६ जणांविरुद्ध गुन्हा

खेड (ता.उत्तर सोलापूर) येथे घराजवळ मोठ्याने का ओरडता असे विचारल्याच्या कारणावरून लोखंडी फायटर, काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत प्रथमेश बब्रुवान खोडके (वय ३०) त्यांची मावस बहीण रुपाली आणि मामा असे तिघे जण जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. जखमी प्रथमेश खोडके यांनी तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी रोहन भोसले, सुरज शिंदे, बाळू सुरवसे, अमोल भोसले, सुनील शिंदे आणि कपिल शिंदे (सर्व रा. खेड) अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार माळी पुढील तपास करीत आहेत.

* घोंगडे वस्तीत मजुराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – घोंगडेवस्ती परिसरातील श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या शेतामध्ये एका झाडाला कृष्णा ईदप्पा कोळी (वय३८ रा. घोंगडे वस्ती,भवानी पेठ) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली.

कृष्णा कोळी हा गवंडी काम करीत होता. काल रात्री त्याने नेहमीप्रमाणे घरात जेवण करून बाहेर पडला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह घराजवळील शेतामध्ये बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद  जोडभावीपेठ पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार बुगड पुढील तपास करीत आहे.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Sattur #beaten #Siddheshwar #factory #Tanker #driver #injured, #सिद्धेश्वर #कारखान्याजवळ #सत्तुर #मारहाण #टँकर #चालक #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मतदानासाठी पैसे वाटप करताना राष्ट्रवादीच्या नेत्याला पकडले
Next Article अखेर विजापूर रस्त्यावरील ‘त्या’ ऑर्केस्ट्रा व डान्स बारचा परवाना रद्द

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?