Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री सिद्धेश्वर यात्रा : योग दंडाच्या पूजनाने सिद्धेश्‍वर यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभ 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

श्री सिद्धेश्वर यात्रा : योग दंडाच्या पूजनाने सिद्धेश्‍वर यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभ 

Surajya Digital
Last updated: 2022/01/10 at 9:56 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : शुक्रवार पेठेतील शेटे (shete) यांच्या वाड्यात योग दंडाच्या पूजनाने सिद्धेश्‍वर यात्रेतील धार्मिक विधींना आज प्रारंभ झाला. ग्रामदैवत (Village Goddess) श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेस सुरूवात झाली. कोरोनाचे (corona) सावट जरी असले तरी भाविकांममधून उत्साह दिसला.

उत्तर कसब्यातील हिरेहब्बू  (Hirehabbu) यांच्या वाड्यातून सकाळी अकरा वाजता योगदंड सिद्धेश्वर कंठीकर यांनी शेटे वाड्यात आणले. शेटे वाड्यात मानकरी रितेश थोबडे (retesh thobade) यांनी योग दंडाला हळद-कुंकू पुष्पहार घालून पूजा केली. त्यानंतर हिरेहब्बू व हब्बू यांची पाद्यपूजा करून प्रसाद दिले. यावेळी सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहबू, अमित हब्बू, राजेश हब्बू, संतोष हब्बू यांच्या उपस्थितीत योग दंडाची पूजा झाली. त्यानंतर होम विधी चा कार्यक्रम झाला. पंचपक्वान्नांचा योगदंडाला व होम विधीला नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी विजया थोबडे, ललिता थोबडे, सुचीता थोबडे, ॲड. मिलिंद थोबडे, श्रद्धा थोबडे, मलिका थोबडे, सुधीर थोबडे, उमेश अक्कलवाडे, प्रतिक थोबडे, शशांक थोबडे, प्रथमेश थोबडे, सिध्देश थोबडे उपस्थित होते.

(Shri Siddheshwar Yatra: Religious rituals of Siddheshwar Yatra begin with worship of Yoga Danda)

□ कुंभार कन्याच्या घरी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू

सोलापूर :  उत्तर कसब्यातील कुंभारवाड्यात कुंभार कन्याच्या घरी विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजता मल्लिकार्जुन म्हेत्रे कुंभार यांच्या निवासस्थानी गणपतीचे व सिद्धरामेश्वरचे प्रतिमेचे पूजन करून दिवे घालण्याचा कार्यक्रम झाला.

त्यानंतर ५६ नग मातीचे घागरी हिरेहब्बू यांच्याकडे योगीराज कुंभार यांच्याकडून सुपूर्द केले. यावेळी मल्लिकार्जुन कुंभार, महादेव कुंभार, रेवणसिद्ध कुंभार, संगणा कुंभार, नागनाथ कुंभार, सुरेश कुंभार उपस्थित होते. १२ जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता तेलाचे घागरीचे विधीवत पूजा करून शिवशेट्टी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येईल तेरा जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता पंचामृत घागरी चे पूजा केले जाईल. १४ जानेवारी रोजी होम कट्ट्यावरील लिंगाची विधिवत पूजा मानकरी कुंभार यांच्याकडून केले जाईल.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

उद्या मंगळवारी (११ जानेवारी) उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या व दुसर्‍या नंदीध्वजास रात्री साज चढवून हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते विधीवत पूजा होईल. बुधवारी (१२ जानेवारी ) योगदंड व मानकर्‍यांच्या उपस्थितीत  ६८ लिंगाना तैलाभिषेक होईल.

गुरूवारी (१३जानेवारी ) सिध्देश्‍वर मंदिरातील संमत्ती कट्यावर सातही नंदीध्वजाच्या साक्षीने योगदंड आणि कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह (marriage) सोहळा पार पडणार आहे. यावेळी समंत्ती वाचन सुहास तम्मा शेटे करणार आहेत. व त्यानंतर योगदंडसह यात्रेतील सातही नंदीध्वजाचे मानकरी ६८ लिंग प्रदक्षिण करणार आहेत.

शुक्रवारी ( १४ जानेवारी) सिध्देश्‍वर मंदिरातील तलावात योगदंडासह मानाच्या सातही नंदीध्वजांना करमुटगी लावून स्नान घालण्यात येते. मात्र यंदा या विधीस प्रशासनाने परवानी नाकारली आहे. सायंकाळी जुन्या फौजदार चावडी जवळ पहिल्या नंदीध्वजास नागाची फणी बांधतात. मात्र यंदा मिरवणुकीस परवानगी नाकरण्यात आली असल्याने हा कार्यक्रम होणार नाही. त्यांनतर यंदा योगदंडाच्या साक्षीने  होम प्रदिपन (Home illumination) सोहळा पार पडणार आहे.  होम प्रदिपन सोहळा पार पडल्यानंतर सिध्देश्‍वर मंदिरा शेजारी असणार्‍या डॉ. निर्मल कुमार फडकुले ( Dr. Nirmalkumar fadkule)  सभागृहासामोर भाकणुक होईल.

रविवारी (१६ जानेवारी) कप्पडकळीने यात्रेची सांगता होणार आहे. शुक्रवार पेठेतील देशमुखांच्या वाड्यात योगदंड पूजा आणि होम होईल. त्यानंतर मानकरी हिरेहब्बू यांची पाद्यपूजा करून देशमुखांच्या  वतीने हिरेहब्बू यांना आहेर करण्यात येईल. या विधी नंतर यात्रेतील धार्मिक विधीची सांगता होईल.

You Might Also Like

सोलापूर : टुर्स बुकिंगच्या आमिषातून ३१ लाखांची फसवणूक

जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन

डॉ. वळसंगकर आत्महत्या : डॉ. शोनाली, डॉ. जोशींच्या सहीचे निवेदन व्हायरल

सोलापूर मनपा, नऊ नगर परिषदा, 11 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

यशवंत पंचायत राजमध्ये सोलापूर जिल्हा परिषद तृतीय

TAGGED: #ShriSiddheshwar #Yatra #Religious #rituals #worship #YogaDanda, #श्रीसिद्धेश्वर #यात्रा #योगदंड #पूजन #धार्मिकविधी #प्रारंभ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिकेत बिघाड झालेल्या हिटरमुळे लागलेल्या आगीत 19 जण ठार तर 63 हून अधिक जखमी
Next Article पुण्यात मानेचा मसाज करताना केले लज्जास्पद कृत्य

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?