Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Navjot Singh Sidhu पार्किंगवरून भांडण : नवज्योत सिंग सिद्धू यांना जेल, सुप्रीम कोर्टाचा निकाल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

Navjot Singh Sidhu पार्किंगवरून भांडण : नवज्योत सिंग सिद्धू यांना जेल, सुप्रीम कोर्टाचा निकाल

Surajya Digital
Last updated: 2022/05/19 at 3:05 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ सागर मीठ कारखान्याची भिंत कोसळली; 12 कामगारांचा मृत्यू, 18 जखमी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि टीम इंडियाचे माजी खेळाडू नवज्योत सिंग सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. रोड रेज प्रकरणी त्यांना 1 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 1988 मध्ये पटियालात पार्किंगच्या वादावरून सिद्धू यांनी एका वृध्दाला मारहाण केली होती. त्यात त्या वृध्दाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सिद्धू यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याला सिद्धू यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. Argument over parking: Navjot Singh Sidhu jailed, Supreme Court verdict

रोड रेज प्रकरणी शिक्षेत वाढ करण्याच्या नवज्योत सिंग सिद्धूंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने नवज्योतसिंग सिद्धू यांना दोषमुक्त करण्याच्या मे 2018 च्या आदेशाचे पुनरावलोकन केले आहे. या आदेशानुसार सिद्धूला पंजाब पोलीस ताब्यात घेणार आहेत. आता आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत सिद्धूंना जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पतियाळा येथे 1988 मध्ये नवज्योत सिद्धू यांचे पार्किंगवरून भांडण झाले होते ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. हे प्रकरण 34 वर्ष जुने आहे. नवज्योत आणि त्याच्या मित्राची पटियाळा येथील कार पार्किंगवरून वाद झाला. या वादात 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांच्या एका मित्राने केलेल्या मारहाणीमध्ये गुरनाम सिंग नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तत्पूर्वी पंजाब-हरयाणा न्यायालयाने सिद्धू यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये तीन वर्षांचा कारावास ठोठावला होता, तर सर्वोच्च न्यायालयाने या आरोपातून सिद्धू यांना मुक्त करत एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

 

□ सागर मीठ कारखान्याची भिंत कोसळली; 12 कामगारांचा मृत्यू, 18 जखमी

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील हलवद येथे सागर मीठ कारखान्याची भिंत कोसळून पाच महिलांसह बारा कामगारांचा मृत्यू झाला आहे. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 30 कामगार दबले गेले. जेसीबी मशिनच्या सहाय्याने मृत व जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

 

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #Argument #parking #NavjotSinghSidhu #jailed #Supreme #Court #verdict, #पार्किंग #भांडण #नवज्योतसिंगसिद्धू #जेल #सुप्रीमकोर्ट #निकाल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उजनीचे पाणी पळवल्यास राष्ट्रवादीसोबत आघाडी नाही : आडम मास्तर
Next Article Attempted murder अकलूजमध्ये जुन्या भांडणाच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?